मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BPSC Recruitment 2024: मुख्याध्यापक आणि मुख्य शिक्षक पदांसाठी भरती; अर्ज प्रक्रियेला ११ मार्चपासून सुरूवात

BPSC Recruitment 2024: मुख्याध्यापक आणि मुख्य शिक्षक पदांसाठी भरती; अर्ज प्रक्रियेला ११ मार्चपासून सुरूवात

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 02, 2024 03:26 PM IST

Head Master and Headteacher Recruitment: बिहार लोकसेवा आयोग म्हणजेच बीपीएससीने ६ हजार ०६ मुख्याध्यापक आणि मुख्य शिक्षक ४० हजार २४७ पदांसाठी अर्ज मागविले जात आहे.

Teachers Recruitment
Teachers Recruitment

BPSC Recruitment 2024: बिहार लोकसेवा आयोग म्हणजेच बीपीएससी मुख्याध्यापक आणि मुख्य शिक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रियेला येत्या ११ मार्च २०२४ पासून सुरुवात होणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२४ आहे. इच्छुक उमेदवार www.bpsc.bih.nic.in येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

बिहार सरकारच्या शिक्षण विभाग आणि अनुसूचित जाती व जमाती कल्याण विभागांतर्गत मुख्याध्यापकांची ६ हजर ६१ पदे आणि शिक्षण विभाग बिहार अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची ४० हजार २४७ पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.

SAIL Recruitment: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ऑपरेटर-कम-टेक्निशियन पदांसाठी भरती; 'अशी' होणार निवड!

अर्ज शुल्क:

सामान्य प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ७५० रुपये आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि सर्व राखीव आणि अनारक्षित महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २०० रुपये आहे.

बेरोजगारांना सुवर्ण संधी! बारामतीत मेगा रोजगार मेळाव्यात होणार २० हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती!

अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम onlinebpsc.bihar.gov.in किंवा bpsc.bih.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि अर्जासह पुढे जा. 
  • अर्ज फॉर्म भरून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा 
  • त्यानंतर अर्ज शुल्क भरा
  • भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिट काढून स्वत: जवळ ठेवावी.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बिहार लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

IPL_Entry_Point