मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सरन्यायाधीशांनी फटकारलं अन् कपिल सिब्बलांनी थेट शिवसेनेची घटनाच वाचून दाखवली, वाचा कोर्टात काय घडलं!

सरन्यायाधीशांनी फटकारलं अन् कपिल सिब्बलांनी थेट शिवसेनेची घटनाच वाचून दाखवली, वाचा कोर्टात काय घडलं!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 21, 2023 12:49 PM IST

uddhav thackeray vs eknath shinde live : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीस सुप्रीम कोर्टात सुरुवात झाली आहे. यावेळी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोग आणि राज्यपालांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

maharashtra political crisis supreme court hearing
maharashtra political crisis supreme court hearing (HT)

maharashtra political crisis supreme court hearing : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. त्यानंतर ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. याशिवाय आज सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्तासंघर्षाच्या याचिकांवरील सुनावणी सुरू झाली असून ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आजपासून सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुरू राहणार आहे. त्यामुळं ठाकरे गटाच्या वकिलांनी त्यांचा युक्तिवाद आजच्या आज संपवावा, असं म्हणत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ठाकरेंच्या वकिलांना चांगलंच फटकारलं. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना राज्यपालांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना थेट कोर्टातच शिवसेनेच्या घटनेचं वाचन करायला सुरुवात केली. शिवसेनेच्या घटनेतील मूळ बाबी, नियम आणि मुद्देच सिब्बल यांनी घटनापीठाला वाचून दाखवले.

ट्रेंडिंग न्यूज

आयोगानं तो निर्णय घ्यायला नको होता- ठाकरे गट

आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाकडे कशी काय सोपवली?, प्रकरण घटनापीठाकडे असताना आयोगानं शिवसेनेवरील तो निर्णय द्यायला नको होता, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी 'आयोगाने या प्रकरणात पुढे जायला नको होतं का?' असा प्रतिप्रश्न तुमचे प्रमुख मुद्दे आम्हाला सांगा, अशी विनंती ठाकरे गटाच्या वकिलांना केली.

त्यानंतर कपिल सिब्बल यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार ज्या पक्षाच्या चिन्हावर आमदार निवडून आले त्याच शिवसेनेचे आमदार 'आम्ही नेतृत्त्वाला मानत नाही', असं कसं काय म्हणू शकतो?, पक्षांतर्गत बंडखोरीमुळं लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असून कोर्टानं शिवसेनेतील बंडखोर आमदारांना तातडीनं अपात्र करायला हवं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point