पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रेखा पात्रा (Rekha patra) यांच्याशी फोनवर संवाद साधला. रेखा पात्रा यांनी संदेशखलीमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली होती. पंतप्रधान मोदींनी त्यांना "शक्ति स्वरूपा" (shakti Swaroopa) म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. मोदींनी त्यांच्या प्रचाराची तयारी, लोकांमध्ये भाजपाप्रति असलेले समर्थन व अन्य मुद्द्यांवर बातचीत केली. यावेळी रेखा पात्रा यांनी संदेशखलीमध्ये महिलांसमोर येणाऱ्या समस्यांशी मोदींना अवगत केले.
भाजपने बशीरहाट मतदारसंघातून रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसने विद्यमान खासदार नुसरत जहाँ यांचे तिकीट कापून माजी खासदार हाजी नुरुल इस्लाम यांना तिकीट दिले आहे.
भाजपने २४ मार्च रोजी जारी केलेल्या उमेदवारांच्या पाचव्या यादीत रेखा पात्रा यांचे नाव होते. भाजपने त्यांना उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. रेखा पात्रा संदेशखलीतील महिला आंदोलनाचा चेहरा आहेत. त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. आता भाजपने त्यांची प्रसिद्धी कॅश करण्यासाठी थेट लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. भाजपने बंगालमधील ४२ जागांपैकी ३८ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
रेखा पात्रा यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे दिग्गज नेते शाहजहां शेख आणि त्यांच्या साथीदारांच्या कथित अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. भाजपने त्यांना बशीरहाट लोकसभा सीटवरून उमेदवार बनवले होते. संदेशखली याच लोकसभा मतदारसंघातील गाव आहे. रेखा संदेशखली आंदोलनाच्या मुख्य चेहरा होत्या.
संबंधित बातम्या