Chhattisgarh Naxalite attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत, तर १४ जखमी झाले आहेत. जखमी जवानांपैकी काहींना उपचारासाठी जगदलपूरला तर काहींना रायपूर इथं एअरलिफ्ट करण्यात आलं आहे.
विजापूर (bijapur) आणि सुकमा (Sukma) जिल्ह्यांच्या सीमेवरील टेकुलगुडम (Tekalgudem) गावात पोलीस छावणी उभारण्यात आली आहे. स्थानिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचा व त्यांच्या मदतीचा उद्देश यामागे आहे.
ही छावणी उभारण्याचं काम झाल्यानंतर कोब्रा, एसटीएफ व डीआरजी फोर्सचे जवान शोधमोहिमेवर निघाले होते. त्याचवेळी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी अचानक बेछूट गोळीबार केला. त्यात ३ जवानांना वीरमरण आलं. तर १४ जखमी झाले.
नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. सुरक्षा दलांपुढं निभाव लागणार नसल्याचं लक्षात येताच नक्षलवादी जंगलात पळून गेले.
संबंधित बातम्या