कल्याणमधून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे एका पत्नीने पोलिसात धाव घेत पती शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार दिली आहे. ही घटना कल्याण पश्चिम येथील शहाड परिसरात घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय पत्नीने ४० पती शारीरिक सुख देत नसून तो नपुंसक असल्याची तक्रार दाखल केली आहे.
पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नापूर्वी पतीला आपण नपूंसक असल्याचे माहिती असूनही ही गोष्ट लपवली व लग्नापासून आपल्याला शारिरीक सुखापासून वंचित ठेवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहिता शहापूर तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबासह राहते. तिचा विवाह कल्याणमधील शहाड येथील एका तरुणासोबत गेल्यावर्षी जून महिन्यात झाला होता. ४० वर्षापर्यंत तुम्ही विवाह का केला नाही, या प्रश्नावर तरुणाने सांगितले की, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपण विवाहासाठी थांबल्याचे सांगितले. तरुण शिकलेला असून तसेच नोकरीला असल्याने तरुणीने त्याला पसंत केले. मात्र लग्नानंतर पती पत्नीला स्पर्शही करत नव्हता. महिलेने अनेकदा भावनिक नात्याबद्दल त्याला समजून सांगितले मात्र त्याच्यात काहीच फरक न पडल्याने ती माहेरी गेली होती.
दरम्यान, नवरा आणि सासरच्या मंडळींच्या आग्रहामुळे महिला परत सासरी आली. त्यावेळी पतीमधील दोष तिच्या निर्देशनास आले. पती काही औषधे घेत असल्याचे तिला आढळले. त्यानंतर तिने संबंधित डॉक्टरकडे जाऊन विचारणा केली असता तिला समजले की, पतीमध्ये शारिरीक दोष असून त्यावर उपचार सुरू आहेत. पतीकडून आपल्याला कधीच शरीरसुख मिळणार नाही, याची खात्री पटल्यावर तिने नवरा नपुसंक असल्याची तक्रार करत तिने घटस्फोटाची मागणी केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.