केरळमधील एका न्यायालयाने भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी PFI संघटनेशी संबंधित १५ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये अलप्पुझा जिल्ह्यातील भाजपच्या अन्य मागास वर्ग (OBC) शाखेचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची हत्या झाली होती. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मावेलिक्कारा व्ही. जी. श्रीदेवी यांनी मंगळवारी दोषींना शिक्षा सुमावली. मृताच्या वकीलांना दोषींना कठोर शिक्षेची मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, ज्या क्रूर पद्धतीने पीडिताला आई, मुले व पत्नीच्या समोर मारले, ते दुर्मिळ प्रकारच्या गुन्ह्यात येते.
भाजप नेते रंजीत श्रीनिवासन यांच्या हत्येत पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि 'सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया' (SDPI) संबंधित कार्यकर्ता सामील होते. या लोकांनी १९ डिसेंबर २०२१ रोजी रंजीत यांच्या घरात घुसून कुटूंबासमोरच त्यांना बेदम मारहाण करत हत्या केली होती. आरोपींचा उद्देश्य श्रीनिवासन यांना पळून जाण्यापासून रोकणे तसेच त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांच्या मदतीला येणाऱ्या अन्य व्यक्तींना रोकणे होता.
यापूर्वी २० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व १५ आरोपींना दोषी ठरवल होतं. ८ जणांना थेट हत्या प्रकरणात दोषी ठरवलं होतं तर ४ जणांनी त्यांना मदत केली होती. अन्य आरोपी घटनास्थळावर धारधार शस्त्रांसह उपस्थित होते. त्यामुळे न्यायालयाने सर्वांना या हत्येत दोषी ठरवलं आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी न्यायालयाच्या या निर्णयामुळे श्रीनिवासन यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असल्याचं म्हटलं आहे.