Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

May 02, 2024 09:28 PM IST

Viral Video : मुलगा जाड असल्याने त्याचा जीव घेतला आहे. सहा वर्षीय मुलाचं वजन जास्त असल्याने एका बापाने अत्यंत संतापजनक कृत्य केले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

वजन जास्त असल्यानं  जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन् घेतला जीव
वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन् घेतला जीव

फिटनेसबाबत सतर्क असणाऱ्या बापाने आपला मुलगा जाड असल्याने त्याचा जीव घेतला आहे. सहा वर्षीय मुलाचं वजन जास्त असल्याने एका बापाने अत्यंत संतापजनक कृत्य केले आहे. बालकाचं वजन कमी करण्यासाठी अवघ्या ६ वर्षाच्या मुलाला जीममध्ये नेऊन ट्रेडमिलवर पळवले. मशीनवर अधिक धावल्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी वडिलावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अमेरिकेतील न्यू जर्सीत घडली आहे. (Man forcing son to run on treadmill)

क्रिस्टोफर ग्रेर (३१) असे आरोपी वडिलाचे नाव आहे. त्यांनी त्यांचा मुलगा कोरी मिचिओलो याला जबरदस्तीने ट्रेडमिलवर धावायला लावले. अटलांटिक हाइट्स क्लबहाऊस फिटनेस सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून ते न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. सीसीटीव्हीमध्ये दिसते की, ग्रेगर आणि कोरी अटलांटिक हाइट्स क्लबहाऊस फिटनेस सेंटरमध्ये प्रवेश करत आहेत. व्हिडिओमध्ये ग्रेगर कोरीला ट्रेडमिलवर जबरदस्तीने चढवतो व पळायला लावतो. तो दमला असतानाही तो त्याला पुन्हा पुन्हा ट्रेडमिलवर चढवून मशिनची सेटिंग बदलतानाही दिसते.

अवघ्या ६ वर्षाच्या कोरीचं वजन जास्त असल्याने त्याला क्रुरपणे ट्रेडमिलवर धावायला लावले. हा व्हिडिओ न्यायालयात सादर केल्यानंतर कोरीची आई ब्रे मिचिलिओ यांनाही अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, कोरीच्या वडिलांवरील गुन्हा दाखल झाला तर त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

मीडियाने दिलेल्या माहितीनुसार कोरीच्या शरीरावर जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे कोरीला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची विनंती आईने केली होती. डॉक्टरांकडे गेल्यानंतर कोरीने डॉक्टरांना सांगितलं की वजन जास्त असल्याने वडिलांनी त्याला ट्रेडमिलवर धावायला सांगितले. ट्रेडमिलवर अधिकवेळ धावल्याने त्याची दुसऱ्यादिवशी त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीच्या शवविच्छेदनात आढळून आले की कोरीचा मृत्यू हृदय व यकृताला झालेल्या दुखापतींमुळे झाला.

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं -

पाकिस्तानमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, पाकिस्तानी आर्मीचे कोबरा सारखे अत्याधुनिक हेलीकॉप्टर गव्हाच्या शेतावरती घिरट्या घालून पिके वाळवत आहे. लष्कराची हेलीकॉप्टर्स गव्हाच्या पिकांवर घिरट्या घालताना काही लोकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद करत तो व्हायरल केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर