मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  bareilly nainital highway accident : बरेली-नैनिताल महामार्गावर भीषण अपघात! कार आणि ट्रकच्या धडकेत ८ जण जिवंत जळाले

bareilly nainital highway accident : बरेली-नैनिताल महामार्गावर भीषण अपघात! कार आणि ट्रकच्या धडकेत ८ जण जिवंत जळाले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 10, 2023 08:04 AM IST

bareilly nainital highway accident : उत्तर प्रदेशातील बरेली-नैनिताल महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. डंपर आणि कारची धडक होऊन लागलेल्या भीषण आगीत तब्बल ८ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला.

bareilly nainital highway accident
bareilly nainital highway accident

bareilly nainital highway accident update: बरेली येथील भोजीपुरा महामार्गावर शनिवारी रात्री रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. डंपर आणि कारची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. डंपरचा चालक जीव मुठीत घेऊन बाहेर पडला. मात्र, कार मधील ८ जणांचा होरळपुन मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे.

Weather Update : राज्यात 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता; गारठाही वाढला; उत्तर भारतात थंडीची लाट; असे असेल आजचे हवामान

मिळालेल्या माहितीनुसार एका लग्न समारंभासाठी एका एर्टिगा कारमध्ये काही नागरीक हे शनिवारी रात्री ११ वाजता बरेलीहून नैनिताल महामार्गावरून बहेडीकडे जात होते. महामार्गावरील भोजीपुराजवळ कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या बाजूवर गेली. यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या भरधाव डंपरला ही कार कार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की डंपर आणि कारला आग लागली. यातच कार मधील आठ जणांचा जळून मृत्यू झाला. महामार्गावरील टायरच्या खुणा पाहून कार डंपरमध्ये अडकून तब्बल १०० मीटरपर्यंत रस्त्यावर फरफट गेल्याचे दिसून येते.

Srinagar : श्रीनगर गोठले! हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद; पारा आला ४.६ अंश सेल्सिअसवर; पाहा फोटो

या भीषण अपघातात गाडीतून उतरण्याची कुणालाही संधि मिळाली नाही. सात सीटर एर्टिगा कारला आग लागण्यामुळे गाडीतील सर्व प्रवासी जिवंत जाळले. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने याची माहिती पोलिसांना देत मदत कार्य राबवले. पोलिस व अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कार आणि डंपरमधील आग विझवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले.

प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतांची संख्या आठ असल्याचे सांगितले. एका कुटुंबाने लग्न समारंभासाठी ही कार बुक केली होती. कारच्या नंबर प्लेटवरून ही कार एर्टिगा असून बाहेरी येथील रामलीला मोहल्ला येथील रहिवासी सुमित गुप्ता यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कार नारायण नागला गावातील एकाने लग्न समारंभासाठी बुक केली होती. कारच्या सीटवर मृतदेह होते, क्षणार्धात आठ जीवंत नागरिकांचा कोळसा झाला होता. धडक होताच काही क्षणात गाडीला आग लागून सर्व नष्ट झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली तेव्हा गाडीच्या आतील सीटवर फक्त सांगाडे होते.

 

WhatsApp channel