Weather Update Today : राज्याच्या जवळ सध्या कुठलीही सिस्टर नाही. तसेच पुढील २४ तास उत्तरी हवेचा प्रभाव राहून त्यानंतर १० डिसेंबर पासून साऊथ ईस्टरली किंवा साऊथ साऊथ ईस्टरली वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुढील ४८ तासात गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति हलका ते हलक्या पावसाची शक्यता राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात काही ठिकाणी आज जोरदार पाऊस तर काही ठिकाणी थंडी वाढणार आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली असून पारा गोठणबिंदुच्या जवळपास पोहचला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण गोवा येथे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकरा तारखेपासून राज्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अनुमान आहे. तर पुणे आणि परिसर पुणे आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील व पुढील ७२ तासात हलके धोके पडण्याची शक्यता आहे. अकरा तारखे नंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
आयएमडीने दिलेल्या अंदाजानुसार आज दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिवसांपासून तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ-माहे आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. येत्या काही दिवसांत या राज्यात मुसळधार पाऊस, गारपीट व धुके पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवर्षाव होण्याची तसेच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात थंडी वाढली आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून पारा हा गोठणबिंदुच्या जवळपास पोहचला आहे.