श्रीनगरमध्ये शुक्रवारी मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तापमान हे उणे ४.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.
(ANI)अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील तापमान या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान होते.
(ANI)काश्मीर खोऱ्यात असलेल्या पहलगाममध्ये प्रदेशातील सर्वात थंड तापमानाची नोंद झाली. पारा शून्याच्या जवळपास पोहचला आहे.
(ANI)श्रीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली असून यामुळे नागरीक रस्त्याच्या कडेला उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
(ANI)बारामुल्ला जिल्ह्यातील प्रसिद्ध रिसॉर्ट गुलमर्ग येथे उणे ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आदल्या रात्री उणे ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान मापकावर झाली.
(ANI)शुक्रवारी रात्री, जम्मू आणि काश्मीरच्या उन्हाळी राजधानीचे तापमान आदल्या रात्रीच्या उणे २.४ अंश सेल्सिअसपेक्षा दोन अंशांपेक्षा जास्त घसरले होते.
(ANI)हवामान विभागाच्या मते, ११ डिसेंबरपर्यंत हवामान सामान्यतः ढगाळ राहण्याची अपेक्षा आहे. परंतु मुख्यतः कोरडे राहील. याशिवाय, रात्रीच्या तापमानात काही अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे.
(ANI)