मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  LIC चा अदानींना अखेर धक्का; अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये अधिकची गुंतवणूक न करण्याचा निर्णय

LIC चा अदानींना अखेर धक्का; अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये अधिकची गुंतवणूक न करण्याचा निर्णय

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 11, 2023 10:58 AM IST

LIC Investment In Adani Group : भारतीय आयुर्विमा महामंडळाने अदानी समूहाला झटका दिला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था अदानी समूहातून गुंतवणूक काढून घेत आहेत. त्या पाठोपाठ आता एलआयसीने देखील अदानी समूहात यापुढे गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्यातरी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये आणखी गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे.

LIC Adani HT
LIC Adani HT

LIC Investment In Adani Group : हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक गुंतवणूकदार अदानी समुहातून काढता पाय घेत आहेत. त्या पाठोपाठ आता भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) अदानी समूहाला मोठा धक्का दिला असून या पुढे अदानी समूहात गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे एलआयसीनं हा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हिंडनबर्गच्या अहवालानंतर, अदानी समूहाला मोठे आर्थिक धक्के बसत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा अदानी एलआयसीला बसला आहे. गुंतवणूकदार बाहेर पडत असून यामुळे अदानी समूहाचे शेअर्स कोसळू लागले आहे. 

अदानी समुहात गुंतवणूक केल्यामुळे एलआयसी वादात सापडली आहे. एलआयसीला मोठा आर्थिक फटका देखील बसला आहे. अदानी समूहात गुंतवणूक केल्याने एलआयसीमधील गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहे. त्यामुळे अदानी समुहातील आधीची गुंतवणूक आहे तशीच ठेवत, नवी गुंतवणूक न करण्याचा निर्णय एलआयसीनं घेतला आहे.

एलआयसीनं गेल्या अनेक वर्षांत अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एकूण ३०,१२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या संदर्भात अध्यक्ष एमआर कुमार यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, अदानी समूहाच्या शेअर्सची घसरण आणि बाजारातील खराब कामगिरीचा एलआयसीच्या एम्बेडेड मूल्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. या गुंतवणुकीवर सकारात्मक परतावा मिळाला आहे.

IPL_Entry_Point

विभाग