Adani stocks : अदानी समूहाच्या कंपन्याच फक्त नफ्यात, गौतम अदानी, गुंतवणूकदार तोट्यात
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani stocks : अदानी समूहाच्या कंपन्याच फक्त नफ्यात, गौतम अदानी, गुंतवणूकदार तोट्यात

Adani stocks : अदानी समूहाच्या कंपन्याच फक्त नफ्यात, गौतम अदानी, गुंतवणूकदार तोट्यात

Feb 10, 2023 12:36 PM IST

Adani Stocks : अदानी समूहाच्या स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार तोट्यात आहेत. खुद्द गौतम अदानींच्या संपत्तीत घसरण झाली आहे. या सर्व घटनानुक्रमात अदानी समूहाच्या बहूतांश कंपन्यांचे तिमाही निकाल अत्यंत चांगले आले आहेत.

Gautam adani HT
Gautam adani HT

Adani stocks: अमेरिकेतील शाॅर्ट सेलिंग कंपनी हिडेनबर्गच्या अहलालानंतर अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार सध्या तोट्यात आहेत. गौतम अदानींच्या संपत्तीत घट झाली आहे आणि जगभरातील अब्जाधीशांच्या यादीतील त्यांचा क्रमांक घटला आहे. या दरम्यान, अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आले आहेत.

२५ जानेवारीपर्यंत गौतम अदानी ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्समध्ये तिसऱ्या स्थानी होते. मात्र आता त्यांचे स्थान थेट २१ व्या स्थानी घसरले आहेत. त्यांच्या संपत्तीतही तब्ब ५५ अब्ज डाॅलर्सची घट झाली आहे. अदानी या वर्षी संपत्ती गमावणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत नंबर एकवर आहेत. एका महिन्यात त्याची संपत्ती १२० अब्जावरुन ५८.२ अब्ज डाॅलर्सपर्यंत घटली आहे.

असे आहेत रिझल्ट

अदानी ग्रीन एनर्जीचा चालू आर्थिक वर्षासाठीचा तिमाही नफा दुप्पट होऊन अंदाजे १०३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आँक्टोबर डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत उत्पन्नात वाढ झाल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी समान तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा ४९ कोटी रुपये होता.

एका महिन्यात किती टक्के घसरण

अदानी समूहाचा हा शेअर निम्म्यापेक्षा अधिक घसरला आहे. दररोज लोअर सर्किट लागणाऱ्या शेअर्सने ५२ आठव्ड्यातील निच्चांकी पातळी गाठली आहे. गेल्या एका महिन्यात त्यात ६१ टक्के घसरण झाली आहे. ५२ आठवड्यातील उच्चांक ३०५० रुपये प्रती शेअर्स मूल्य असणाऱ्या अदानी ग्रीनचा शेअर्स आता ७२४.२५ रुपयांवर आहे.

अदानी विल्मरच्या नफ्यात १५ टक्के वाढ

अदानी विल्मरचा नफा तिसऱ्या तिमाहीत १५ टक्क्यांनी वाढून २४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याआधी गेल्या वर्षीच्या समान तिमाहीत कंपनीने २११.४१ कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला होता. डिसेंबरच्या तिमाही दरम्यान उत्पन्नात वाढ होऊन १५,५१५.५५ कोटी रुपयांवर पोहोचले होते. गेल्या वर्षी समान कालावधीत ते १४,३९८.०८ कोटी रुपये होते.

अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये घसरण

गेल्या महिन्यात अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये २१ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. त्याची ५२ आठवड्याची उ्च्चांकी पातळी ८७८ आणि निचांकी पातळी ३०५ रुपये आहे. आता स्टाॅक ४४९.१५ रुपयांवर ट्रेड करत आहे.

अदानी टोटल गॅसच्या नफ्यात वाढ

अदानी समूह आणि फ्रान्सच्या टोटल एनर्जीच्या संयुक्त कंपनी अदानी टोटल गॅसच्या डिसेंबरला संपलेल्या तिमाहीचा शुद्ध नफा १३ टक्क्यांनी वाढून १४८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही कंपनी वाहनांसाठी सीएनजी आणि घरगुती गॅस पाईपलाईन (पीएनजी ) पुरवते. विक्री वाढल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने १३२ कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

गुंतवणूकदारांना नुकसान

हा स्टाॅक एका महिन्यात अंदाजे ३६५६.६० रुपयांवरुन ६५.६७ टक्के घसरुन १२५५.४० रुपयांवर आला आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या एक लाखांची गुंतवणूक आता अंदाजे ३५००० रुपये राहिली आहे.

Whats_app_banner