Adani LIC : एलआयसीचे अध्यक्ष अदानी समूहाची भेट घेणार आहेत. अदानी समूहात एलआयसीच्या गुंतवणूकीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुंतवणूकदारांसह विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे.
हिडेनबर्ग अहवालाच्या मुद्दयावरुन अदानी समूहामध्ये वादळ निर्माण झाले आहे. त्यातच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय आणि एलआयसीने अदानी समूहाला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याचे उघडकीस आले.
यासंदर्भात आता एलआयसीचे अध्यक्ष ए. आर. कुमार आता गौतम अदानी आणि अदानी समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या दरम्यान ते अदानी ग्रुपमधील संकटाबद्दल स्पष्टीकरण मागणार आहेत.हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपचे अनेक शेअरमध्ये मोठ्या फरकाने चढ उतार होत आहेत. अहवालात अदानी समुहावर कथित गैरव्यवहार आणि लेखा परिक्षणात घोटाळा केल्याचा आरोप आहे.
आमचे प्रमुख व्यवस्थापन या प्रकरणात त्यांच्याशी संपर्क करतील, आता आम्ही आर्थिक अहवालाच्या चिंतेत आहोत. लवकर आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. या प्रकरणात अदानी समूह आणि शेअर बाजारातील घडामोडींसंदर्भात त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले जाणार आहे,असे त्यांनी सांगिततेल. दरम्यान या दोन्ही समूहांमधील बैठक नेमकी केव्हा होईल याबाबत काही सीमारेषा निश्चित केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.