Elections Result : गुजरातमध्ये भाजप आघाडीवर; हिमाचलमध्ये काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Elections Result : गुजरातमध्ये भाजप आघाडीवर; हिमाचलमध्ये काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर

Elections Result : गुजरातमध्ये भाजप आघाडीवर; हिमाचलमध्ये काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर

Dec 08, 2022 09:13 AM IST

Gujarat Assembly Elections 2022 : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे.

Gujarat Assembly Elections Result 2022
Gujarat Assembly Elections Result 2022 (HT)

Gujarat Assembly Elections Result 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजेपासून गुजरातमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली असून पोस्टल मतमोजणीत भाजपनं मोठी आघाडी घेतली आहे. हाती आलेल्या कलांनुसार भाजपनं १८२ जागांपैकी १११ आणि काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यामुळं आता निकालांमध्ये हेच कल कायम राहिले तर गुजरातमध्ये भाजप सलग सातव्यांदा सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. सध्या गुजरात विधानसभेत भाजपचे ९० आणि काँग्रेसचे ७७ आमदार आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन एक तास झाला असून दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी जेव्हा सकाळी आठ वाजता सुरू झाली तेव्हा भाजपनं पहिल्या मिनिटांपासून आघाडी घेतलेली आहे. भाजपचे १११ उमेदवार आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे ५१ आणि आम आदमी पक्षाचे ५ उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळं आता मतमोजणीच्या एक तासाच्या आतच निवडणुकीच्या निकालांची दिशा काय असणार आहे, हे स्पष्ट होत आहे.

हिमाचलमध्ये काँग्रेस पुनरागम करण्याची शक्यता...

हिमाचल प्रदेशातल्या निवडणुकीच्या निकालांमध्ये सुरुवातीच्या कलांपासून काँग्रेसनं आघाडी घेतली असून हाती आलेल्या माहितीनुसार, ६१ पैकी ३० जागांवर काँग्रेस आघाडीवर असून भाजप २६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं आता हिमाचलमध्ये काँग्रेसला बहुमतानं सत्ता मिळणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहे.

गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष...

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं १११ जागांवर मुसंडी मारल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. सूरत, अहमदाबाद, बडौदा आणि गांधीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे आणि लाडू वाटून संभावित निकालाचा जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर