मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गुजरातमध्ये निकालानंतर आमदारांना राजस्थानमध्ये हलवणार; घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसचा निर्णय

गुजरातमध्ये निकालानंतर आमदारांना राजस्थानमध्ये हलवणार; घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसचा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 08, 2022 08:32 AM IST

Gujarat Assembly Elections : गुजरातमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांना राजस्थानमध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Gujarat Assembly Elections 2022
Gujarat Assembly Elections 2022 (HT)

Gujarat Assembly Elections 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या तीन पक्षांत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. परंतु आता गुजरातमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानं पळवापळवी आणि घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसच्या निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेसशासित राजस्थानमध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता निकालाआधीच गुजरातमध्ये राजकीय वादंग पेटण्यास सुरुवात झाली आहे. गुजरातमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल ७७ आमदार निवडून आले होते. त्यामुळं आता यावेळच्या निवडणुकीत आमदारांचा आकडा वाढण्याची शक्यता पाहता काँग्रेसनं हा मोठा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये विधानसभेच्या निकालांचं चित्र स्पष्ट होताच काँग्रेसच्या सर्व आमदारांना बसमध्ये बसवून शेजारचं राज्य असलेल्या राजस्थानात नेण्यात येणार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसनं सत्तास्थापनेसाठी उशीर केला होता. त्यामुळं भाजपनं काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता स्थापन केली होती. त्यामुळं आता काँग्रेसचे आमदार फुटू नयेत, यासाठी शीर्ष नेत्यांनी मोठी काळजी घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता गुजरातमध्ये निकालाआधीच हालचालींना मोठा वेग आला आहे.

गुजरातमध्ये भाजपची गेल्या २७ वर्षांपासून सत्ता आहे. परंतु यावेळी भाजपसह काँग्रेस आणि आम आदमी पक्षानंही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसलेली आहे. सकाळी आठ वाजेपासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गुजरातमध्ये १८२ जागांसाठी निकाल जाहीर करण्यात येणार असून त्यामुळं आता निकालात कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point