मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujarat Himachal Assembly Election Results 2022 Live Updates: उद्धव ठाकरेंनी केलं भाजपचं अभिनंदन

Gujarat Himachal Assembly Election Results 2022 Live Updates: उद्धव ठाकरेंनी केलं भाजपचं अभिनंदन

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 08, 2022 04:06 PM IST

Assembly Election Results 2022 Live Updates : गुजरात व हिमाचल प्रदेशातील निवडणुकीच्या मतमोजणी जवळपास पूर्ण झाली असून गुजरातमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. तर, हिमाचलमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ पोहोचली आहे.

Assembly Election Results 2022
Assembly Election Results 2022

Assembly Election Results 2022 Live Updates: गुजरात व हिमाचल प्रदेशातील निवडणुकीच्या मतमोजणी जवळपास पूर्ण झाली असून गुजरातमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. तर, हिमाचलमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ पोहोचली आहे.

निवडणूक निकालांचे लाइव्ह अपडेट्स

 

  • Uddhav Thackeray on Gujarat Election Results: गुजरात निवडणुकीतील विजयाबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

  • Gujarat Government Oath taking ceremony: गुजरातमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवत सातव्यांदा सत्ता ताब्यात घेतली आहे. येत्या १२ डिसेंबरला गुजरात सरकारचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत.

 

  • Bhupendra Patel Victory: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. भूपेंद्र पटेल ५० हजारांहून अधिक मतांनी तर जयराम ठाकूर २० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

 

  • Himachal Election Results Live: हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे. इथं त्रिशंकू निकाल समोर आल्यास अपक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतात. अपक्षांपैकी बहुतांश आमदार भाजपचे बंडखोर नेते आहेत. तिकीट न मिळाल्यानं नाराज होऊन त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

 

  • गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आम आदमी पक्ष खूश, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा

  • Gujarat Election Results 2022: गुजरातमध्ये भाजपला आजवरचा विक्रमी विजय मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत हाती आलेले कल पाहता भाजपनं १५० जागांचा टप्पा ओलांडला आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष खूप पिछाडीवर आहेत.

 

  • रविंद्र जडेजाची पत्नी रिबावा जडेजा जामनगरमधून आघाडीवर

 

  • गुजरातमध्ये भाजपची १५१ जागांवर आघाडी, काँग्रेस पिछाडीवर

 

  • हिमाचल प्रदेशमध्ये भाजप ३२ तर काँग्रेसची ३३ जागांवर आघाडी

 

  • गुजरातमध्ये आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इशूधान गढवी पिछाडीवर

 

  • वीरगाममधून भाजप उमेदवार हार्दिक पटेल पिछाडीवर

 

  • गुजरातमध्ये भाजप आघाडीवर; हिमाचलमध्ये काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर

 

  • Gujarat election Counting LIVE: गुजरातमध्ये भाजपची मोठी आघाडी. तब्बल १०० जागांवर घेतली आघाडी. काँग्रेसची अवस्था बिकट

 

  • Himachal Pradesh Matmojni LIVE: हिमाचल प्रदेशात सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात. भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत. दोन्ही पक्ष प्रत्येकी १५ जागांवर आघाडीवर

 

  • Himachal Pradesh Nivadnuk Nikal LIVE: हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सत्तांतराचा ट्रेंड दिसतो. हाच ट्रेंड यावेळीही कायम राहणार का याबद्दल उत्सुकता आहे. भाजपला पुन्हा एकदा इथली सत्ता ताब्यात घ्यायची असून सत्तांतरांची हिमाचलची परंपरा यावेळीही कायम राहील, असा विश्वास काँग्रेसला आहे. राज्यात ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार नशीब आजमावत असून मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि भाजपचे माजी प्रमुख सतपाल सिंह सत्ती यांचं भवितव्य आज ठरणार आहे.

 

  • Gujarat election result 2022: गुजरातमध्ये ३३ जिल्ह्यांतील १८२ विधानसभा जागांसाठी १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत निवडणुका झाल्या. राज्यातील ३७ मतमोजणी केंद्रांवर गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होत असते. मात्र, यावेळी 'आप'च्या रिंगणात उतरल्यानं राज्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी, युवा नेते हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांच्यासह एकूण १६२१ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज होईल. या निवडणुकीत ७० राजकीय पक्ष आणि ६२४ अपक्ष उमेदवारही आपलं नशीब आजमावत आहेत.

 

  • भाजप, काँग्रेस व आम आदमी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला विजयाचा दावा

 

  • गुजरात व हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

IPL_Entry_Point