मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : जेलमध्ये बैचेन झाले मुख्यमंत्री केजरीवाल; झोपही आली नाही; अशी गेली जेलमधली पहिली रात्र

Arvind Kejriwal : जेलमध्ये बैचेन झाले मुख्यमंत्री केजरीवाल; झोपही आली नाही; अशी गेली जेलमधली पहिली रात्र

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 02, 2024 02:02 PM IST

Arvind kejriwal in Tihar : दारू घोटाळ्यात अटक झाल्यानंतर तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पहिल्या रात्री बेचैन झाले. त्यांना रात्रभर झोप लागली नाही. ते त्यांच्या कोठडीतच चालत राहिले.

जेलमध्ये बैचेन झाले मुख्यमंत्री केजरीवाल; झोपही आली नाही; अशी गेली जेलमधली पहिली रात्र
जेलमध्ये बैचेन झाले मुख्यमंत्री केजरीवाल; झोपही आली नाही; अशी गेली जेलमधली पहिली रात्र

Arvind kejriwal in Tihar : दारू घोटाळ्या प्रकरणी न्यायालयीन तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली रात्र अस्वस्थता आणि बेचैनीत घालवली. केजरीवाल त्यांच्या १४ X८ च्या कोठडीतील झोपू शकले नाहीत. रात्रभर ते कोठडीत फिरताना दिसले. केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण देखील कमी होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना आवश्यक औषधे देण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यात खळबळ; महिला पोलीस निरीक्षकाच्या हप्तेखोरीला कंटाळून व्यावसायिकानं पोलीस ठाण्यातच पेटवून घेतलं!

तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, केजरीवाल यांना सोमवारी दुपारी ४ वाजता तिहारमध्ये आणण्यात आले. कोठडीत पाठवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांची साखरेची पातळी ५० पेक्षा कमी होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना आवश्यक औषधे देण्यात आली. मुख्यमंत्री पदावर असताना अटक झालेले केजरीवाल हे देशातील पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. पत्नी सुनीता आणि दोन्ही मुले आज मंगळवारी भेटण्याची शक्यता आहे.

जपानच्या शाही कुटुंबाने Instagram वर अकौंट उघडताच अख्ख्या देशभरात का होतय कौतुक! काय आहे प्रकरण?

मंगळवारी एका सूत्राने सांगितले की, मुख्यमंत्री अरविन्द केजरीवाल यांना संध्याकाळी चहा आणि रात्री घरी बनवलेले जेवण देण्यात आले. त्यांना झोपण्यासाठी एक गादी, ब्लँकेट आणि दोन उशा देण्यात आल्या. केजरीवाल काही वेळ सिमेंटच्या बाकड्यावर झोपले. पण त्याला झोप येत नव्हती. रात्री उशिरा ते त्यांच्या कोठडीत फिरताना दिसले. सकाळीही केजरीवाल यांची साखरेची पातळी तपासण्यात आली. ती सामान्यपेक्षाखाली आली होती. सध्या तिहार तुरुंगातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते आहेत.

lok sabha election 2024 live : संजय राऊत यांच्या भेटीनंतर भाजपचे खासदार उन्मेष पाटील मातोश्री निवासस्थानी पोहोचले

केजरीवाल यांच्या साखरेची पातळी सामान्य होईपर्यंत घरचे जेवण खाण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी दुपारचे आणि रात्रीचे जेवण घरून आणले जाणार आहे. केजरीवाल हे आज सकाळी त्यांच्या सेलमध्ये ध्यानधारणा करत होते. सकाळी त्यांना चहा आणि बिस्किटे देण्यात आली. सेलच्या बाहेर दोन जेल वॉर्डर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कारागृह प्रशासन सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय सेलच्या बाहेर क्यूआरटी टीमही तैनात करण्यात आली आहे.

केजरीवाल यांनी जी तीन पुस्तके मागवली होती त्यात रामायण आणि महाभारत ही पुस्तके त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यांनी न्यायालयात मागणी केलेले धार्मिक माळ देखील त्यांना घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. केजरीवाल यांनी सहा लोकांची नावे दिली आहेत ज्यांना ते भेटू इच्छितात. यामध्ये त्यांची पत्नी सुनीता आणि मुलगा व मुलीचा समावेश आहे. त्यांचे स्वीय सचिव बिभव कुमार आणि संदीप पाठक यांचाही या यादीत समावेश आहे. सोमवारी अरविंद केजरीवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना २१ मार्च रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.

IPL_Entry_Point