मराठी बातम्या  /  elections  /  lok sabha election 2024 live : भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

lok sabha election 2024 live : भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 02, 2024 03:27 PM IST

Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात व देशात घडामोडींना वेग आला आहे. वाचा, दिवसभरातील घडामोडींच्या क्षणोक्षणीच्या बातम्या…

भाजपला धक्का! विद्यमान खासदार उन्मेष पाटील संजय राऊत यांच्या भेटीला
भाजपला धक्का! विद्यमान खासदार उन्मेष पाटील संजय राऊत यांच्या भेटीला

Lok Sabha Election 2024 Updates : महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक जागांचा आणि उमेदवारांचा तिढा कायम असला तरी उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या सगळ्या घडामोडींचे क्षणोक्षणीचे अपडेट्स…

लोकसभा निवडणुकीचे लाइव्ह अपडेट्स:

> भाजपचे खासदार उन्मेष पाटील उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. पाटील यांच्यासोबत

 

 

> बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार असल्याची चर्चा. शरद पवार म्हणाले, चांगली गोष्ट आहे.

> नाशिकचे सध्याचे खासदार हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पुन्हा मुंबईत. गोडसे यांच्या जागेवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा ठोकल्यानं हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात

> भाजपचे खासदार उन्मेष पाटील उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. पाटील यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष करण पवार हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती.

> माजी मंत्री रामदास कदम यांनी खेड नगरपालिकेची जमीन हडपली; शिवसेनेचे आमदार अ‍ॅड. अनिल परब यांचा आरोप

> संजय राऊत यांच्या भेटीनंतर भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल.

> किरीट सोमय्या (Kirti Somaiya) हे महाराष्ट्राचे अण्णा हजारे आहेत - अनिल परब

> एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ठाण्याची जागा राखण्यासाठीही संघर्ष करावा लागतोय. बाळासाहेबांचं नाव घेऊन ते काम करतात असं सांगतात. अशी वेळ आली असती तर बाळासाहेबांनी सरळ लाथ मारली असती. शिंदेंचा स्वाभिमान आता कुठं गेलाय? - अनिल परब यांचा सवाल

> एकनाथ शिंदे म्हणाले होते, माझ्या सोबत आलेल्या सर्व १३ खासदारांना निवडून आणणार. आता १३ जागा मिळण्याचे वांधे झाले आहेत. - अनिल परब यांचा टोला

> संजय राऊत हे माझे संसदेतील सहकारी आहेत. आमच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यातूनच मी त्यांना भेटायला आलो होतो. प्रत्येक भेटीत राजकारण असलंच पाहिजे असं नाही. तुमच्या प्रश्नाची सविस्तर उत्तरं लवकरच देईन - उन्मेष पाटील

> भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भाजपनं तिकीट नाकारल्यामुळं नाराज असलेले उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

> बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात बाह्या सरसावणारे विजय शिवतारे यांचं बंड थंड झालं आहे. त्यानंतर ते महायुतीच्या उमदेवाराच्या प्रचाराला लागले आहेत. आज त्यांनी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली.

> शिंदे गटाचे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलली जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हेमंत पाटील हे आज शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. ते मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत.

> दारात येऊ बसले आणि छाती पिटली तरी गद्दारांसाठी शिवसेनेचं दार उघडणार नाही. गद्दारांना घेतलं तर तो निष्ठावंत शिवसैनिकांचा अपमान ठरेल - संजय राऊत

> साडेसतरा रुपयांची साडी वाटून अमरावतीची बेइज्जती करून टाकली - बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांच्यावर आरोप

> नवनीत राणा ३ लाखांहून अधिक मतांनी निवडून येईल, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा यांचं डिपॉझिट जप्त होईल असा दावा बच्चू कडू यांनी केला होता. त्याला रवी राणा यांनी उत्तर दिलं आहे.

WhatsApp channel