मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  DK Shivakumar Delhi Visit : दिल्ली दौरा रद्द करत डीके शिवकुमारांचं पक्षश्रेष्ठींना भावनिक आवाहन, म्हणाले...

DK Shivakumar Delhi Visit : दिल्ली दौरा रद्द करत डीके शिवकुमारांचं पक्षश्रेष्ठींना भावनिक आवाहन, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 16, 2023 07:30 AM IST

DK Shivakumar Delhi Visit : निकाल लागून तीन दिवस होऊनही काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटलेला नाही. यावरून अनेक नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे.

Karnataka Congress chief DK Shivakumar
Karnataka Congress chief DK Shivakumar (ANI)

DK Shivakumar Delhi Visit : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. परंतु आता निकाल लागून तीन दिवस झालेले असतानाच अद्याप काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटलेला नाही. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे कर्नाटकातील विजयी आमदारांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. त्यानंतर आता डीके शिवकुमार यांनी दिल्ली दौरा रद्द करत काँग्रेस शीर्ष नेत्यांना भावनिक आवाहन केलं आहे. मला निष्ठेच्या बदल्यात निष्ठा मिळेल, असं वक्तव्य डीके शिवकुमार यांनी केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

माध्यमांशी बोलताना डीके शिवकुमार म्हणाले की, मी औषधं आणि इंजेक्शन्स घेतलेली असल्यामुळं मला दिल्लीत जाता आलेलं नाही. तसंही मी काही काँग्रेस हायकमांडचा भाग नाहीये. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. निकाल आल्यानंतर अनेकांना मला संधी देण्याची विनंती केली आहे. त्यावर काँग्रेसचं शीर्ष नेतृत्व अंतिम निर्णय घेईल. सध्या काँग्रेसमध्ये १३५ आमदार आहेत, ती एकच संख्या आहे आणि ते आमदार डीके शिवकुमारचे नाहीत, असं म्हणत शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तसेच काँग्रेसकडून मला निष्ठेच्या बदल्यात निष्ठा मिळेल, असंही शिवकुमार यांनी म्हटलं आहे.

मला कोणतीही संख्या माहिती नाही. साहस असणारा व्यक्ती बहुमत तयार करत असतो. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय मी काँग्रेसच्या हायकमांडवर सोडला आहे. त्यामुळं मला निष्ठेचं फळ मिळेल, अशी आशा असल्याचंही शिवकुमार यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे काँग्रेसमधील बहुसंख्य आमदारांचा सिद्धरामय्या यांना पाठिंबा असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या निरिक्षकांनी विजयी आमदारांशी चर्चा केली असून आज चार वाजेपर्यंत कर्नाटकातील काँग्रेसचा मुख्यमंत्री जाहीर होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point