मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jayalalitha Death : जयललितांचा मृत्यू नाही तर हत्या झाली; माजी न्यायाधीशांच्या दाव्यानं खळबळ

Jayalalitha Death : जयललितांचा मृत्यू नाही तर हत्या झाली; माजी न्यायाधीशांच्या दाव्यानं खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 18, 2022 05:41 PM IST

Jayalalitha Death : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या करण्यात आली होती, असा दावा एका माजी न्यायमूर्तीनं केला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

Jayalalitha Death Mystery
Jayalalitha Death Mystery (HT)

Jayalalitha Death Mystery : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि द्रमूकच्या दिवंगत नेत्या जे जयललिता यांचा मृत्यू झाला नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका माजी न्यायाधीशानं केला आहे. त्यामुळं तामिळनाडूसह देशाच्या राजकाकणात खळबळ उडाली असून जललितांच्या मृत्यूला सहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला असताना आता त्यांचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए अरुमुघस्वामी यांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत एक अहवाल सादर केला आहे. त्यात जयललितांची अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असताना डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष का केलं?, याशिवाय त्यांच्या निकटवर्तीय शशिकला यांची भूमिकाही संधिग्ध असून त्यांच्यासह जयललितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज असल्याचं न्यायाधीश ए अरुमुघस्वामी यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

जयललिता यांची पद्धतशीर हत्या करण्यासाठी शशिकला यांच्यासह इतर काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. कारण त्या दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर वाद झालेला होता. त्यानंतर आता त्यांचीही चौकशी करण्याची गरज असल्याचं न्यायाधीश ए अरुमुघस्वामी यांनी सादर केलेल्या अहवालात सांगितलं आहे.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा २०१६ मध्ये चेन्नईतील एका रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २०१७ साली मद्रास हायकोर्टानं त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश ए अरुमुघस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. त्यानंतर या समितीनं तब्बल पाच वर्ष तपास केल्यानंतर त्याचा अहवाल जारी केला आहे. त्यामुळं आता यावरून तामिळनाडूत राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग