मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Diwali Festival 2022 : दिवाळीआधीच पगार आणि बोनसही; राज्य सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

Diwali Festival 2022 : दिवाळीआधीच पगार आणि बोनसही; राज्य सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 18, 2022 04:11 PM IST

Diwali Festival 2022 : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं मोठी घोषणा केली आहे. त्यामुळं आता कर्मचाऱ्यांची दिवाळीआधीच 'आर्थिक दिवाळी' साजरी होणार आहे.

DCM Devendra Fadnavis Announcement Today
DCM Devendra Fadnavis Announcement Today (HT)

DCM Devendra Fadnavis Announcement Today : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच म्हणजे येत्या २१ तारखेला देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. त्यामुळं आता शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच शिंदे-फडणवीस सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. याशिवाय दिवाळी बोनसही येत्या २१ तारखेला पगारासह जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून महागाईनं त्रस्त असलेल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिवाळी सणाच्या आधीच चालू महिन्याचा पगार आणि दिवाळीचा बोनस देण्यात यावा, अशी मागणी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर या मागणीला गंभीरतेनं घेत राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनससह पगार देण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे. त्यामुळं २४ तारखेला असलेल्या दिवाळीआधी पगारासह बोनस मिळणार असल्यानं कर्मचाऱ्यांना मनसोक्त खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि बेस्टच्या कामगारांना २२ हजारांचा बोनस आणि आरोग्य सेविकांना एक महिन्याचा बोनस देण्यात येणार आहे.

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच पगार देण्यासह आता सर्व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मान्यता दिली आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह गट क आणि गट ब अशा अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळं या संवर्गातील कर्मचाऱ्यांना १२५०० रुपयांची रक्कम दिली जाणार असून त्यासाठी १० महिन्यांच्या परतफेडीचा कालावधी देण्यात येणार आहे. अग्रीम उत्सवाला कर्मचाऱ्यांना रक्कम दिल्यास कर्मचारी मोठ्या प्रमाणात शॉपिंग करत असतात, त्यामुळं राज्य शासनाच्या महसूलात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point