मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka New CM : निकाल लागताच काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू, कर्नाटकात दलित व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची मागणी

Karnataka New CM : निकाल लागताच काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू, कर्नाटकात दलित व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 13, 2023 06:49 PM IST

Karnataka Election Results 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल १२६ जागा जिंकत काँग्रेसने बहुमत मिळवलं आहे.

New CM In Karnataka
New CM In Karnataka (Shashidhar Byrappa)

Veerappa Moily Wants Dalit CM In Karnataka : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. काँग्रेसने १२६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यानंतर आता घोडेबाजार टाळण्यासाठी सर्व विजयी आमदारांना काँग्रेस नेत्यांनी हैदराबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता कर्नाटकातील विधानसभेचा निकाल लागताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी कर्नाटकात दलित व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांना दलित मुख्यमंत्री हवा असेल तर पक्षातील शीर्ष नेतृत्व त्यांच्याविरोधात जाऊ शकणार नाही. हायकमांडने संधी दिल्यास मी देखील मुख्यमंत्री होण्यास तयार असल्याचं वीरप्पा मोईली यांनी म्हटलं आहे. कर्नाटकातील मुख्यमंत्री कोण असेल, हे दिल्लीतील हायकमांड आमच्यावर लादू शकत नाही. डीके शिवकुमार हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून काँग्रेसचं राज्यभरात काम करत असल्याचंही मोईली यांनी म्हटलं आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झालं आहे. उद्या बंगळुरुत होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत कर्नाटकातील मुख्यमंत्री कोण असेल, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील लवकरच नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

IPL_Entry_Point