मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Election Results : कर्नाटकात द्वेषाचं दुकान बंद झालंय, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Karnataka Election Results : कर्नाटकात द्वेषाचं दुकान बंद झालंय, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 13, 2023 03:24 PM IST

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने शंभराहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

Congress leader Rahul Gandhi
Congress leader Rahul Gandhi (Congress twitter)

Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत बहुमतासह सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. काँग्रेसने आतापर्यंत तब्बल ५० जागा जिंकल्या असून ८७ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे. तर दुसरीकडे भाजपने २१ जागांवर विजय मिळवला असून ४१ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळं आता कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. राजधानी बंगळुरुसह राज्यातील अनेक भागांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल मी कानडी जनतेचे, काँग्रेसचे नेते तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानतो. कर्नाटकात एका बाजूने क्रोनी कॅपिटलिस्ट होते तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेची ताकद होती. त्यामुळं जनतेने भाजपला हरवलं आहे. आता कर्नाटकात द्वेषाचं दुकान बंद झालं आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्ही कुणाचाही द्वेष न करता निवडणूक लढवली. प्रेम या देशातील लोकांना आवडतं. त्यामुळं आता भाजपचा पराभव झाल्यामुळं कर्नाटकात प्रेमाचं दुकान सुरू झालं आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता, त्यानंतर आता कर्नाटकातील लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला भरभरून मतदान केल्याचं निकालातून दिसून येत आहे. त्यानंतर आता विजयी उमेदवारांना काँग्रेसच्या नेत्यांनी तातडीनं हैदराबादला रवाना केलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point