मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fire Incident : बसमध्ये दिवाळीचे दिवे लावून ड्रायव्हर-कंडक्टर झोपले आणि आक्रित घडलं!

Fire Incident : बसमध्ये दिवाळीचे दिवे लावून ड्रायव्हर-कंडक्टर झोपले आणि आक्रित घडलं!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 25, 2022 11:24 AM IST

Fire Incident In Jharkhand : ड्रायव्हर आणि कंडक्टर बसमध्ये दिवा लावून झोपी गेले होते. त्यावेळी बसमध्ये आग लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे.

Fire Incident In Jharkhand
Fire Incident In Jharkhand (HT)

Fire Incident In Jharkhand : दिवाळी साजरी करत असताना बसमध्ये दिवा लावणं ड्रायव्हरसह कंडक्टरला महागात पडलं आहे. कारण दिवा लावल्यानं बसमध्ये लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. झारखंडमधील कांटाटोलीतील खादगडामध्ये ही घटना घडली असून जेव्हा बस पेटली तेव्हा चालक आणि वाहक झोपलेले होते. बस पेटल्यानं या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला असून ऐन दिवाळीतच ही दुर्दैवी घटना घडल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या कांटाटोलीत मृत मदन आणि इब्राहिम यांनी दिवाळीला बसमध्ये दिवा लावला होता. त्यानंतर दोघेही बसमध्ये झोपी गेले. परंतु दिवा सीटवरून खाली पडल्यानं बसमध्ये भीषण आग लागली. मदन आणि इब्राहिम गाढ झोपेत असल्यानं दोघांनाही या आग लागल्याचं समजलं नाही. परिणामी दोघांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेमुळं दुख: व्यक्त केलं आहे. घडलेली घटना अत्यंत दुखद असून ईश्वर मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुख: पचवण्याची शक्ती देवो, असं मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटलं आहे.

ऐन दिवाळीत झारखंडमध्ये खळबळ...

संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात असताना दिव्यामुळं बस पेटल्यानं दोघांचा मृत्यू झाल्यानं झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

IPL_Entry_Point

विभाग