मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Diwali : सातासमुद्रापार व्हाईट हाऊसमध्येही दिवाळी साजरी; बायडन यांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

Diwali : सातासमुद्रापार व्हाईट हाऊसमध्येही दिवाळी साजरी; बायडन यांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 25, 2022 08:46 AM IST

Diwali Celebration At White House : संपूर्ण जगभरात दिवाळी सणाचा उत्सव पाहायला मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रपती बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली आहे.

Diwali Celebration At White Hous
Diwali Celebration At White Hous (HT)

Diwali Celebration At White House : सध्या संपूर्ण जगभरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळं लोकांना दिवाळी साजरी करता आलेली नव्हती. परंतु यावर्षी सर्व नियम हटवल्यानं मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. असाच काहीसा उत्साह अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्येही पाहायला मिळाला आहे. कारण यूएसचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासह दिवाळी साजरी केली आहे. बायडन यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन झाल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग न्यूज

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या शासनकाळात व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती. अमेरिकेतील महत्त्वाच्या आणि प्रभावशाली पदांवर भारतीयांसह आशियाई लोकांचा टक्का सातत्यानं वाढत असल्यानं दरवर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दिवाळीचा सण साजरा करत असतात. त्यामुळंच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांची पत्नी डॉ. जिल बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याबरोबर दिवाळी साजरी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आशियाई वंशाचे काही खासदारही उपस्थित होते.

दिवाळीला अमेरिकेच्या संस्कृतीचा भाग बनवल्याबद्दल धन्यवाद- बायडन

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा सण साजरा करताना राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, तुम्हा लोकांसाठी दिवाळीचा सण साजरा करण्याची मला संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. व्हाईट हाऊसमध्ये पूर्वीपेक्षा जास्त आशियाई-अमेरिकन लोक आहेत. दिवाळीचा सण आपल्याला आठवण करून देतो की आपल्या प्रत्येकामध्ये जगाला उजळवण्याची ताकद आहे. मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो.

IPL_Entry_Point

विभाग