मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बाप रे ! पाहून हसायची व चिढवायची; १४ वर्षाच्या मुलाने ७ वर्षीय चिमुकलीचा दाबला गळा, दगडाने ठेचले डोके

बाप रे ! पाहून हसायची व चिढवायची; १४ वर्षाच्या मुलाने ७ वर्षीय चिमुकलीचा दाबला गळा, दगडाने ठेचले डोके

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 10, 2024 07:21 PM IST

Boy Murderd 7 years Girl : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने ७ वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तिचे डोके दगडाने ठेचले. दोघे एकमेकांच्या शेजारी रहात होते.

१४ वर्षाच्या मुलाकडून ७ वर्षीय चिमुकलीची गळा दाबून हत्या
१४ वर्षाच्या मुलाकडून ७ वर्षीय चिमुकलीची गळा दाबून हत्या

छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने ७ वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तिचे डोके दगडाने ठेचले. दोघे एकमेकांच्या शेजारी रहात होते. आरोपी मुलाने हत्येचे कारण सांगितल्यानंतर सर्वांना धक्का बसला. चिमुकली आरोपीला पाहून त्याला चिढवत होती. याचा त्याला इतका राग आला की, त्याने तिला संपवले. गळा दाबल्यानंतर दगडाने ठेचून मुलीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न केला. ही घटना कबीरधाम जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी आरोपीला पकडून त्याला रिमांड होममध्ये पाठवले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी आरोपीला पाहून हसत होती, व त्याला नेहमी चिढवायची. मात्र तिला कल्पना नव्हती की, त्याला याचा इतका राग येतो. कारण त्याने यापर्वी कधीही असे करू नको म्हणून सांगितले नव्हते. मुलगी शाळेतून आपल्या घरी जात असताना रस्त्यात तिने मुलाला पाहिले व ती त्याला चिढवू लागली. याता आरोपीला राग आला व तो मुलीला ओढत आपल्या घरी घेऊन गेला.

घरी नेऊन आरोपीने मुलीचा गळा दाबून हत्या केली. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. गळा दाबल्यानंतर आरोपीने मुलाला भिंतीवर आपटले. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि शरीराच्या अन्य भागावर दगडाने वार केले. 

रिपोर्टनुसार, मुलगी शाळेतून घरी न आल्याने कुटूंबाने तिची शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरा तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. १४ वर्षाच्या मुलावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. आरोपीने सांगितले की, मुलगी त्याला चिढवत होती व त्याला पाहून हसत होती. याचा याला राग आल्याने तिची गळा दाबून हत्या केली व शरीर दगडाने ठेचले.

IPL_Entry_Point

विभाग