मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बंद दुकानाबाहेर थांबलेली महिला अचानक हवेत उलटी लटकू लागली, घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

बंद दुकानाबाहेर थांबलेली महिला अचानक हवेत उलटी लटकू लागली, घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 10, 2024 06:37 PM IST

Viral Video : महिला एका जनरल स्टोअर्सच्या बाहेर दुकान उघडण्याची वाट पाहत उभी आहे. इतक्यात असे काही होते की, ही महिला हवेत उलटी लटकू लागते.

महिला अचानक हवेत उलटी लटकू लागली, थरारक VIDEO व्हायरल
महिला अचानक हवेत उलटी लटकू लागली, थरारक VIDEO व्हायरल

अनेक वेळा थोडीसी चुकी मोठ्या अपघाताला आमंत्रण देणारी ठरू शकते. याला कोणालाही दोषी घरता येत नाही. अशीच एक घटना यूकेमधील एका वृद्ध महिलेसोबत घडली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, महिला एका जनरल स्टोअर्सच्या बाहेर कोणाची तरी वाट पाहत अभी आहे. कदाचित ती दुकान उघडण्याची वाट पाहत आहे. इतक्यात असे काही होते की, ही महिला हवेत उलटी लटकू लागते.

७२ वर्षीय महिला बंद दुकानाच्या बाहेर उभी होती. इतक्यात कोणीतरी या दुकानाचे इलेक्ट्रिक सिक्योरिटी शटर उचलले. यावेळी महिलेचा ड्रेस शटरमध्ये अडकला आणि महिला शटरसोबत वर ओढू लागली. महिला उलटी लटकू लागल्यानंतर एका व्यक्तीने पळत येऊन महिलेचा जीव वाचवला.

हा व्हिडिओ पाहताना खूपच गंमतीशीर वाटतो. मात्र जर तत्काळ मदत मिळाली नसती तर ती डोक्यावर पडली असती व गंभीर दुखापत झाली असती. हा व्हिडिओ @goodnewsmovement या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

दक्षिणी वेल्समधील रोंडाडा सिनॉन टॅफ येथील स्टोरमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणारी वृद्ध महिला एनी आपल्या शॉपिंग ट्रॉली बॅगला घट्ट पकडून शटरला उल्टी लटकली होती. १२ सेकंदापर्यंत ती या स्थितीत राहिली. तेव्हा दुकानातील कर्मचारी तत्काळ बाहेर येऊन त्याने महिलेची मदत केली. या घटनेवर ऐनीने म्हटले की, मी भाग्यवान आहे की, माझा कोट फाटून वेगळा झाला नाही. तसे झाले असते तर मी तोंडावर आपटले असते.

IPL_Entry_Point

विभाग