मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Turkey Earthquake : हा तुर्कीतील विनाशकारी भूकंपाचा संकेत तर नव्हता ना?; व्हायरल व्हिडिओची चर्चा

Turkey Earthquake : हा तुर्कीतील विनाशकारी भूकंपाचा संकेत तर नव्हता ना?; व्हायरल व्हिडिओची चर्चा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 07, 2023 01:17 PM IST

Turkey Earthquake : तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपात आतापर्यंत तब्बल चार हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु भूकंप होण्यापूर्वी परिसरातील पक्ष्यांमध्ये चलबिलच होत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Turkey Syria Earthquake Live Updates
Turkey Syria Earthquake Live Updates (HT)

Turkey Syria Earthquake Live Updates : आशिया आणि युरोपचं प्रवेशद्वार मानला जाणाऱ्या तुर्कीमध्ये भीषण भूकंपाचे एकामागून अनेक धक्के बसले आहे. त्यामुळं दक्षिण तुर्की आणि सीरियात भूकंपामुळं आतापर्यंत तब्बल चार हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हजारो मोठ-मोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या असून मलब्यात दबलेल्या लोकांना वाचवण्याचं काम प्रशासनाकडून जारी आहेत. भारतासह जगभरातील अनेक देशांनी तुर्कीतील भूकंपग्रस्तांना वाचवण्यासाठी सैन्यांची तुकडी पाठवली आहे. परंतु आता तुर्कीतील भूकंपापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात वेगवेगळे पक्षी विचित्रपणे उडत घाबरलेल्या स्थितीत काही तरी घडणार असल्याचे संकेत देत आहेत. त्यामुळं भूकंप होणार असल्याचं पक्ष्यांना आधीच कळालं होतं, असा दावा करत अनेक युजर्स व्हायरल व्हिडिओ शेयर करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तुर्कीतील भूकंपाआधीच्या पक्ष्यांच्या हालचालीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्राणी, पक्ष्यांना भूकंप होणार असल्याचं समजलं होतं, त्यामुळं त्यानी अशा हालचाली केल्याचा दावा युजर्सकडून करण्यात येत आहे. त्सुनामी किंवा भूकंप अशा आपत्तींची सर्वात आधी माहिती साप, पक्षी, उंदीर, कुत्रे या प्राण्यांना समजत असते. प्राणी आणि पक्ष्यांना भूकंप होण्याआधी जमिनीतील हालचालींची माहिती समजत असते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधील बदल आणि बॅरोमेट्रिक दाब याबाबतची माहिती पक्ष्यांना समजत असल्याचं युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालातून समोर आलेलं आहे.

ज्या ठिकाणी भूकंप होणार आहे त्या ठिकाणच्या पाळीव प्राण्यांना भूगर्भातील कमी फ्रिक्वेंसीच्या भूकंपाबद्दलची माहिती होत असते. भूकंपाची कल्पना झाल्यानंतर पक्षी आणि प्राण्यांच्या वर्तनात मोठा बदल होतो. त्यानंतर त्या ठिकाणांहून तातडीनं स्थलांतर करतात. असंही अहवालातून समोर आलेलं आहे. त्यामुळं आता तुर्कीतील भूकंपाआधीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात पक्षांना भूकंपाची माहिती आधीच समजली होती, असा दावा करण्यात येत आहे.

IPL_Entry_Point