मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BHEL Recruitment 2024: दरमहा १ लाख पगार, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती!

BHEL Recruitment 2024: दरमहा १ लाख पगार, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 19, 2024 04:39 PM IST

BHEL Recruitment 2024 Eligibility: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेलमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

Bharat Heavy Electricals Limited Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेलमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भेलच्या bhel.com या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये जीडीएमओ आणि स्पेशलिस्ट पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीसाठी विविध पदांवर भरती करण्यात प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२४ आहे. या भरती अंतर्गत या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट आहे.

Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया किंवा स्टेट मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

Police Bharti : खुशखबर..! महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, आता 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

किती वेतन मिळणार?

जीडीएमओ या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना ९५ हजार रुपये वेतन दिले जाईल. तर, स्पेशलिस्ट पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दहमहा १ लाख १० हजार ४०० रुपये पगार दिला जाणार आहे.

निवड प्रक्रिया

वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जात आहे. उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी वॉक-इनसाठी उपस्थित राहावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे, अर्ज केलेल्या उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

IPL_Entry_Point