मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 15, 2024 04:32 PM IST

Indian Railway Job 2024: भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

भारतीय रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.
भारतीय रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

Government Jobs 2024: भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची चांगली संधी चालून आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने आजपासून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स (RPSF) मध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात केली. फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट rpf.Indianrailways.gov.in ला भेट द्यावी लागेल. या भरती अंतर्गत ४ हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत. या भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

अधिकृत अधिसूचनेनुसार, १५ एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२४ आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार सरकारची अधिकृत वेबसाईट rpf.Indianrailways gov.in येथे अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण ४ हजार ६६० पदे भरली जातील. यातील ४ हजार २०८ पदांवर हवालदारांची निवड केली जाणार आहे. तर, उपनिरीक्षकांसाठी ४५२ पदे भरली जाणार आहेत.

BOI Recruitment 2024 : बँक ऑफ इंडियामध्ये १४३ पदांसाठी भरती! असा करा अर्ज

शैक्षणिक पात्रता आणि वय

उपनिरीक्षक पदावर काम करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. दहावी उतीर्ण परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करू शकतात. उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा २० ते २८ वर्षे आणि कॉन्स्टेबल पदासाठी १८ ते २८ वर्षे आहे.

Agniveer Recruitment 2024: अग्निवीरसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच होत आहे बंद, वाचा पात्रता व अर्ज करण्याची पद्धत

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. एसी, एसटी, माजी सैनिक, महिला उमेदवार आणि ईबीसी श्रेणींसाठी २५० रुपये फी आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

- सर्व प्रथम उमेदवारांनी आरपीएफची अधिकृत साईट indianrailways gov.in येथे भेट द्यावी.

- जिथे RPF Recruitment 2024 पर्यायवर क्लिक करावे.

- यानंतर भरतीचा फॉर्म दिसेल, जिथे सर्व आवश्यक महिती भरून सबमिट बटणावर क्लिक करा.

- पुढे अर्ज शुल्क भरा.

- अर्ज डाऊनलोड करून त्याचे प्रिंटआऊट काढून घ्या.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम ऑनलाइन संगणक आधारित चाचणी (CBT) मध्ये उपस्थित राहावे लागेल. त्यानंतर सीबीटीमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल, ज्यासाठी त्यांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी हजर राहावे लागेल. कृपया लक्षात घ्या की माजी सैनिकांना शारीरिक चाचणीमध्ये उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.

IPL_Entry_Point