Coal Ministry Recruitment Experience: सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.कोळसा मंत्रालयात विविध पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत. कोळसा मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार निवडलेल्या उमेदवारासाठी प्रतिनियुक्तीचा कालावधी ०१ वर्ष असेल. त्यानंतर कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांचा कालावधी ३ वर्षांपर्यंत वाढण्यात येईल. या नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार कोळसा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट coal.nic.in वर अर्ज करू शकतात.
या भरती अंतर्गत एकूण ३ पदे भरली जाणार आहेत. कोळसा मंत्रालय भरती २०२४ साठी अर्ज करणार आहेत, त्यांची वयोमर्यादा ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावी. या पदांसाठी करण्याऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून खाण अभियांत्रिकीमध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी (B.Tech किंवा BE/M.Tech) असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे.
कोळसा मंत्रालयात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची वैयक्तिक मुलाखतीद्वारे थेट निवड केली जाणार आहे. उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
कोळसा मंत्रालयात नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना दरमहा ७५ हजार रुपये पगार देण्यात येईल.