Indian Bank Recruitment News: इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या १४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १२ मार्चपासून सुरू होणार असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ एप्रिल आहे. इच्छुक उमेदवार www.indianbank.in येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
स्पेशालिस्ट ऑफिसरच्या १४६ जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. अर्ज करण्याची थेट लिंक: एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे. इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १००० रुपये आहे.