Agniveer Recruitment 2024: भारतीय लष्करातील अग्नीवीर पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी उद्या (२२ मार्च २०२४) शेवटची मुदत आहे. कारण उद्या अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन नोंदणीची विंडो बंद होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी जूनपर्यंत अर्ज केला नाही, त्यांनी अधिकृत वेबसाइट, join Indianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करावा.
जाहिरातीनुसार, अग्निवीर भरतीची ऑनलाइन अर्जाची विंडो १३ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती व आता २२ मार्च रोजी बंद होणार आहे.
भारतीय लष्कर अग्निवीर भरतीची लेखी परीक्षा एप्रिल २०२४ रोजी नियोजित केली आहे. मात्र याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. लिखित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी परीक्षेसाठी बोलावले जाईल.
अग्निवीर भरती जाहिरातीनुसार अग्निवीर जनरल ड्युटी (Agniveer General Duty), अग्निवीर टेक्निकल (Agniveer Technical) अग्निवीर ऑफिस असिस्टंट, स्टोअर कीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन पदासाठी अर्ज मागवले जात आहेत.
अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे वय १७ ते २१ वयांच्या दरम्यान असावे. त्याचबरोबर जीडी, तांत्रिक, ट्रेड्समन पदासाठी उमेदवारांची उंची १६९ सेमी असावी. सहायकच्या तांत्रिक पदासाठी उमेदवारांची उंची १६२ सेंमी असावी.