मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agniveervayu : अग्नीवीरवायु भर्ती अर्ज प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या पात्रता आणि फिटनेस अट

Agniveervayu : अग्नीवीरवायु भर्ती अर्ज प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या पात्रता आणि फिटनेस अट

Jan 15, 2024 06:25 PM IST

IAF Agniveervayu Eligibility: अग्निपथ योजनेद्वारे भारतीय वायुदल कशी निवड केली जाते, हे जाणून घेऊयात.

Indian Air Force
Indian Air Force

IAF Agniveervayu Recruitment Physical Criteria: भारतीय वायुदल अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांची निवड करते. या योजनेंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीसह एकूण ४ वर्षे सशस्त्र दलात पूर्णवेळ काम करण्याची संधी मिळते. या योजनेंतर्गत भारतीय लष्करासह भारतीय वायुदल आणि भारतीय नौदलातही भरती केली जाते. अग्निपथ योजनेंतर्गत इच्छुक उमेदवार भारतीय हवाई दलात कसे सामील होऊ शकतात आणि त्यासाठी पात्रता निकष काय आहे? हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय वायुसेनेने अग्निवीर योजनेंतर्गत अग्निवीरावू भर्ती २०२४ साठी अर्ज मागिवले आहेत. येत्या १७ जानेवारीपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होईल. तर, अर्जाची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२४ आहे. उमेदवार IAF Agniveervayu,  agnipathvayu.cdac.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण ३ हजार ५०० रिक्त जागा भरल्या जातील.

वय

अग्निपथ योजनेद्वारे भारतीय वायु दलात सामील होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय साडेसतरा वर्षे आणि कमाल वय २१ वर्षे असावे. म्हणजेच इच्छुक उमेदवारांची जन्मतारीख २ जानेवारी २००४ ते ०२ जुलै २००७ दरम्यान असावी.

शैक्षणिक पात्रता

अग्निवीरवायूची शैक्षणिक पात्रता उमेदवाराने अर्ज केलेल्या स्ट्रिमवर अवलंबून असेल. पात्रता तपासण्यासाठी या लिंकवर क्लिक करावी. उमेदवार ५०% गुणांसह गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर ५०% गुणांसह अभियांत्रिकी (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/माहिती तंत्रज्ञान) मध्ये तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केलेला असावा.

अग्निवीर परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होईल. आयएएफ अग्निवीर वायु दलासाठी तीन टप्प्यात परीक्षा घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात संगणक-आधारित चाचणी, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

भारतीय वायु दलात सामील होण्यासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

- किमान उंची १५२.५ सेमी असावी.

- छातीची किमान मर्यादा ५ सेमी असावी, वजन आणि उंची वयाच्या प्रमाणात असावे.

- प्रत्येक कानाने ६ मीटर अंतरावरून ऐकायला आले पाहिजे.

- दातांचा संच आणि हिरड्या निरोगी असाव्यात.

 

शारीरिक तंदुरुस्ती चाचणी

- ०६ मिनिटे ३० सेकंदात १.६ किलोमीटर धावावे लागेल.

- एका मिनिटात १० सिट-अप करावे लागतील.

- एका मिनिटात १० पुश-अप करावे लागतील.

- एका मिनिटात २० स्क्वॅट्स करावे लागतील.

 

अर्ज कसा करायचा?

- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

- यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.

- वैयक्तिक माहिती भरून सबमिट करा.

- आता युजर आयडीने लॉग इन करा.

- त्यानंतर फॉर्म भरा आणि अर्ज शुल्क भरून सबमिट बटणावर क्लिक करा.

- फॉर्मची एक प्रत डाउनलोड करून भविष्यासाठी स्वत:जवळ ठेवा.

टी-२० वर्ल्डकप २०२४