मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rishi Sunak : फक्त ऋषी सुनकच नाही, या भारतीयांनीही रोवलाय विदेशात झेंडा, पाहा यादी

Rishi Sunak : फक्त ऋषी सुनकच नाही, या भारतीयांनीही रोवलाय विदेशात झेंडा, पाहा यादी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 25, 2022 03:01 PM IST

Indian Origin Foreign President : भारतीय व्यक्ती दुसऱ्या एखाद्या देशात सर्वोच्च स्थानी पोहचणयाची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेक भारतीयांनी विविध देशांचं प्रमुखपद भूषवलेलं आहे.

Indian Origin Foreign President
Indian Origin Foreign President (Bloomberg)

Indian Origin Foreign President : भारतीय वंशाचे ऋषि सुनक हे आता इंग्लंडचे पंतप्रधान होणार आहेत. येत्या काही दिवसांत ते ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळं आता सुनक यांचं जगभरातून अभिनंदन केलं जात आहे. परंतु भारतीय वंशाचा व्यक्ती विदेशातील एखाद्या देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अनेक भारतीय वंशाच्या लोकांनी विविध देशांचा कारभार संभाळलेला आहे. ते कोण आहेत आणि त्यांनी कोणत्या देशामध्ये भारताचा झेंडा रोवलाय, जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

प्रिती पटेल- इंग्लंड

भारतातील गुजराती समुदायातून येणाऱ्या प्रिती पटेल यांनी इंग्लंडच्या गृहमंत्रीपदापर्यंत मजल मारलेली आहे. नोकरीसाठी पटेल कुटुंब युरोपात स्थायिक झालं होतं. प्रिती यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंग्लंडच्या राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ब्रिटनचं गृहमंत्रीपद संभाळलं.

लिओ वराडकर- आयर्लंड

लिओ वराडकर हे महाराष्ट्रातील कोकणी व्यक्ती आहेत. त्यांचे वडिल अशोक यांचा जन्म कोकणात झाला होता. परंतु ते व्यवसाय आणि नोकरीसाठी युरोपात गेले. त्यानंतर ते आयर्लंड या देशात स्थायिक झाले. लिओ यांचं शिक्षणही युरोपातच झालं. त्यानंतर त्यांनी आयर्लंडच्या संरक्षणमंत्रीपदापर्यंत मजल मारली होती. २०१७ ते २०२० या काळात ते आयर्लंडचे संरक्षणमंत्री होते. याशिवाय सध्याही ते आयर्लंडमध्ये मोठ्या पदावर आहेत.

कमला हॅरिस- अमेरिका

कमला हॅरिस यांची आई भारतातील तामिळनाडूतल्या आहेत. भारतात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शामला गोपीनाथन या अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तिथंच आफ्रिकी-अमेरिकन व्यक्तीशी लग्न केलं. कमला या गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या संसदेत खासदार आहेत. सध्या त्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून काम पाहत आहेत.

ऋषि सुनक- इंग्लंड

ऋषि हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. ते येत्या काही दिवसांतच इंग्लंडच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. याआधी त्यांनी इंग्लंडच्या अर्थमंत्रीपदाचा कारभार पाहिलेला आहे. त्यांचे कुटुंबीय स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातून परदेशात स्थायिक झाले होते.

वेवल रामकलावन- सेशेल्स

भारतीय वंशाचे व्यक्ती वेवल रामकलावन हे २०२० साली सेशेल्स देशाचे राष्ट्रपती झाले होते. २०२० च्या आधी रामकलावन हे सेशेल्स संसदेतील विरोधी पक्षाचे नेते होते. त्यांचे वडिल आणि आजोबांचा जन्म बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात झाला होता. रामकलावन हे गेल्या २० वर्षांपासून सेशेल्सच्या राजकारणात सक्रिय आहेत.

प्रविंद जुगनाथ- मॉरिशस

उत्तर प्रदेशातील अहिर हिंदू कुटुंबात जन्म झालेल्या प्रविंद जुगनाथ हे सध्या मॉरिशसचे पंतप्रधान आहेत. २०२२ मध्ये ते भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. आयुष्यात संघर्षमय स्थितीला सामोरं जात ते आज यशाच्या शिखरावर पोहचले आहेत.

हलिमा याकूब- सिंगापूर

भारतीय वंशाच्या महिला हलिमा याकूब या सध्या आशियातील स्वित्झर्लंड म्हणून समजल्या जाणाऱ्या सिंगापूर देशाच्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी सिंगापूरच्या संसदेत अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यांचे वडिल भारतीय होते. हलिमा याकूब या सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत.

मोहम्मद इरफान अली- गयाना

२०२० मध्ये दक्षिण अमेरिकेतल्या गयाना या देशाचं पंतप्रधानपद भारतीय वंशाचे मोहम्मद इरफान अली यांच्याकडे आलं होतं. अनेक वर्ष गयानामध्ये राजकारण व समाजकारणात काम केल्यानंतर अली यांनी गयानाचं प्रमुखपद भूषवलं आहे.

अँटोनियो कोस्टा- पोर्तुगाल

युरोपातील सर्वात सुंदर देशांपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या पोर्तुगाल देशाच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या अँटोनियो कोस्टा यांची २०१५ साली निवड झाली होती. त्यांचे वडिल गोव्यातील आहेत. त्यांचा जन्म मोझांबिकमध्ये झाला होता.

IPL_Entry_Point

विभाग