मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rishi Sunak : दागिने विकून इंग्लंडला स्थायिक झालं होतं सुनक कुटुंब; ऋषी यांनी केलं कष्टाचं चीज

Rishi Sunak : दागिने विकून इंग्लंडला स्थायिक झालं होतं सुनक कुटुंब; ऋषी यांनी केलं कष्टाचं चीज

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 25, 2022 03:02 PM IST

Rishi Sunak Family : इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केलं. परंतु आता पहिल्यांदाच भारतीय वंशाचे ऋषि सुनक हे इंग्रजांच्या देशावर राज्य करणार आहेत.

Rishi Sunak Family
Rishi Sunak Family (HT)

Rishi Sunak Family : भारतावर १५० वर्ष अधिराज्य गाजवलेल्या इंग्रजांच्या देशात आता भारतीय वंशाचे ऋषि सुनक सत्तेवर येणार आहेत. त्यामुळं आता संपू्र्ण आशियासह जगभरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. परंतु या पदापर्यंत पोहचण्याचा सुनक यांचा प्रवास काही सोपा नव्हता. स्वातंत्र्यपूर्व काळात उदरनिर्वाहासाठी भारत सोडल्यानंतर सुनक कुटुंबियांना फार संघर्ष करावा लागला होता. ऋषि सुनक यांच्या आजींनी लग्नातील दागिने विकून इंग्लंड गाठलं. तिथं काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांनी कुटुंबातील इतर व्यक्तींनाही इंग्लंडला बोलावून घेतलं. आता सुनक कुटुंबियांची तिसरी पिढी इंग्लंमध्ये विविध क्षेत्रांत योगदान देत असतानाच ऋषि सुनक यूकेचे पंतप्रधान होणार आहेत.

काय आहे सुनक कुटुंबाचा इतिहास?

उदरनिर्वाहासाठी सुनक कुटुंब सर्वात आधी टांझानियाला गेलं होतं. त्यानंतर ऋषि सुनक यांच्या आजींनी लग्नात मिळालेले दागिने विकून नोकरीसाठी इंग्लंडला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. काही वर्षे लिसेस्टरमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी सुनक कुटुंबातील इतर सदस्यांनाही इंग्लंडला बोलावून घेतलं. १९७७ साली यशवीर आणि उषा यांचं लग्न झालं. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला ज्याचं नाव ऋषि ठेवण्यात आलं. ऋषि यांना एक भाऊ आहे ज्यांचं नाव संजय असून ते मनोवैज्ञानिक आहेत. तर त्यांची बहिण राखी या संयुक्त राष्ट्रसंघात काम करतात. आता ऋषि सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होणार असल्यानं सुनक कुटुंबानं केलेल्या कष्टाचं चीज झालं आहे.

दरम्यान ऋषि सुनक हे २०१४ साली पहिल्यांदा खासदार झाले होते. त्यानंतर त्यांनी अर्थमंत्रीपदाचा कार्यभार संभाळला होता. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आले होते. परंतु ऐनवेळी लिझ ट्रस्ट यांनी बाजी मारली होती. परंतु आता लिझ यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर ऋषि सुनक यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

IPL_Entry_Point

विभाग