मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpari Murder Case : सहा वर्षांपूर्वी आईवर अत्याचार, मुलानं दिल्लीतून पुणे गाठत दाम्पत्याला संपवलं

Pimpari Murder Case : सहा वर्षांपूर्वी आईवर अत्याचार, मुलानं दिल्लीतून पुणे गाठत दाम्पत्याला संपवलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 13, 2023 03:50 PM IST

Pimpari Chinchwad Crime News : घरमालकानं सहा वर्षांपूर्वी अत्याचार केल्याचा आरोप करत यूपीएससी करणाऱ्या तरुणानं दाम्पत्याचं फावड्यानं मुंडकं छाटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pimpari Chinchwad Pune Crime News Marathi
Pimpari Chinchwad Pune Crime News Marathi (HT_PRINT)

Pimpari Chinchwad Pune Crime News Marathi : घरमालकानं सहा वर्षांपूर्वी आईवर अत्याचार केल्याचा आरोप करत यूपीएससी करणाऱ्या तरुणानं दाम्पत्याच्या डोक्यात फावड्यानं वार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पिंपरीत ही धक्कादायक घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. प्रसन्ना प्रमोदराव मंगरूळकर असं आरोपीचं नाव असून मारुती काटे आणि संगीता काटे असं हत्या करण्यात आलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसन्ना मंगरुळकर हा मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील असून आई शिक्षिका असल्यामुळं तिची पिंपरी-चिंचवडमध्ये बदली झाली होती. २०१५ ला आरोपी प्रसन्ना आपल्या आईसह मारुती काटे यांच्या घरात भाड्यानं राहत होता. त्यावेळी मारुती काटे यानं आपल्या आईवर अत्याचार केल्याचा आरोप करत प्रसन्नानं काटे दाम्पत्याची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसन्ना हा यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी पुण्यातून दिल्लीत स्थायिक झाला होता. परंतु काटे यांच्यावरील राग मनात धरून त्यानं पुन्हा पुणे गाठलं. त्यानंतर दुकानातून फावडं आणि टिकाव खरेदी करून काटे यांच्या घरी आला.

आरोपी प्रसन्ना काटे यांच्या घरी आल्यानंतर त्यानं बॅगेतील फावडं काढून काटे दाम्पत्यावर जोरदार हल्ला चढवला. मारुती काटे यांच्या डोक्यात फावडं मारल्यानंतर त्यांची पत्नी संगीता यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु संतापलेल्या प्रसन्नानं संगीताही डोक्यात फावडं मारून हत्या केली. त्यानंतर रक्ताने माखलेलं फावडं हातता घेऊन प्रसन्ना पोलिस स्टेशनला जाण्यासाठी निघाला. त्यावेळी उपस्थितांनी फावड्यावरील रक्त पाहताच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रसन्नाला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point