मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  V Prabhakaran : राजीव गांधी हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड प्रभाकरन जिवंत असल्याच्या दाव्यानं खळबळ

V Prabhakaran : राजीव गांधी हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड प्रभाकरन जिवंत असल्याच्या दाव्यानं खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 13, 2023 04:50 PM IST

LTTE Prabhakaran Alive : श्रीलंकेतील दहशतवादी संघटना असलेल्या लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन हा जिवंत असल्याचा दावा नेदुमारन यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे.

Velupillai Prabhakaran LTTE Alive
Velupillai Prabhakaran LTTE Alive (HT)

Velupillai Prabhakaran LTTE Alive : १९९० च्या दशकात श्रीलंकेत स्वतंत्र तामिळ राष्ट्राच्या मागणीसाठी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलाम या अतिरेकी संघटनेची स्थापना करणारा व्ही प्रभाकरन हा जिवंत असल्याचा दावा तमिळ संघटनेच्या जागतिक महापरिषदेचे अध्यक्ष पी नेदूमारन यांनी केला आहे. त्यामुळं आता श्रीलंकेसह भारतात खळबळ उडाली असून यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. श्रीलंकेतील जाफना प्रांत हा स्वतंत्र तामिळ राष्ट्र करण्यासाठी मागणी लिट्टे अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलाम या संघटनेनं हिंसाचार करत अनेक लोकांची हत्या केली होती. त्यावेळी तात्कालीन भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारताची शांतीसेनेसह श्रीलंकेच्या लष्कराच्या मदतीनं जाफनातून लिट्टेचा नायनाट केला होता. याशिवाय २००७ साली श्रीलंकन लष्करानं लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन याला ठार मारलं होतं. परंतु आता तामिळ संघटनेच्या नेत्यानं केलेल्या दाव्यामुळं नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तामिळ संघटनेचे नेते अध्यक्ष पी नेदूमारन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन मारला गेलेला नाही, तो जिवंत आहे. प्रभाकरन हे तमिळी लोकांसाठी लवकरच नवी आनंदाची बातमी देणार आहेत. लिट्टे प्रमुख प्रभाकरन येत्या काही काळात लोकांसमोर येणार असल्याचा दावा करत नेदुमारन यांनी त्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन तामिळींना केलं आहे. त्यामुळं आता नेदूमारन यांच्या नव्या दाव्यामुळं श्रीलंकेच्या लष्करानं केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. नेदूमारन यांनी केलेल्या दाव्यावर अद्याप श्रीलंकन लष्करानं कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.

राजीव गांधींच्या हत्येत होता सहभाग...

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेतील जाफना प्रांतात भारतीय लष्कर (शांतीसेना) पाठवून लिट्टेची बंडखोरी मोडून काढली होती. या कारवाईत श्रीलंकन लष्कराचाही सिंहाचा वाटा होता. त्यामुळं सूडाच्या भावनेनं पेटलेल्या लिट्टेच्या अतिरेक्यांनी तामिळनाडूतील श्रीपेराईंबदूरमध्ये राजीव गांधींची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा लिट्टे प्रमुख प्रभाकरन असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर २००७ साली श्रीलंकन लष्करानं प्रभाकरनला एका कारवाईत ठार मारल्याचं जाहीर केलं होतं.

IPL_Entry_Point