मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबद्दल विचारताच अजित पवार ताडकन म्हणाले…

Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबद्दल विचारताच अजित पवार ताडकन म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 16, 2023 08:40 PM IST

Ajit pawar on govt with Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पहाटे घेतलेल्या शपथविधीवर बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit pawar on govt with Devendra Fadnavis : तीन वर्षांपूर्वी झालेला पहाटेचा शपथविधी सध्या राज्याच्या राजकारणात पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याविषयी केलेला गौप्यस्फोट त्यासाठी कारण ठरला आहे. या शपथविधीचा भाग असलेले विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही त्याबद्दल विचारलं जात आहे. मात्र, आज त्यांनी या संदर्भातील प्रश्नावर काहीसं त्राग्यानंच उत्तर दिलं.

ट्रेंडिंग न्यूज

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी २०१९ मध्ये एका पहाटे अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती व सरकार स्थापन केलं होतं. हे सरकार दीड दिवसांत कोसळलं. त्यामुळं भाजपची चांगलीच नाचक्की झाली होती. एका वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी हा शपथविधी शरद पवार यांच्या संमतीनंच झाला होता, असा दावा केला. त्यावरून पुन्हा एकदा कल्लोळ सुरू झाला आहे.

शरद पवार यांचं नाव घेतानाच या शपथविधीबाबत अधिक बोलण्यास फडणवीस यांनी नकार दिला. अजित पवार यावर काही बोलल्यास मी पुढचं सांगेन, असं ते म्हणाले होते. त्यामुळं पत्रकारांनी आज अजित पवार यांना याबद्दल विचारलं. मात्र, त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. मात्र, पत्रकार पुन्हा पुन्हा विचारू लागल्यानं ते नाराज झाले.

‘त्या घटनेविषयी मी बोलणार नाही. बाकीचे काय बोलतात, त्यावर मला काही म्हणायचं नाही. मी त्याबद्दल बोलणार नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर मला विचारा. अजित पवार मागेच बोललेला आहे. तो त्याच्या मतावर ठाम राहणार. त्यामुळं तुम्ही कितीही उगळून काढलं तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार,’ असं अजित पवारांनी सुनावलं.

IPL_Entry_Point

विभाग