Mumbai water supply Update : मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. गोरेगाव येथील पी दक्षिण विभागातील जलवाहिनी बदलण्याचे काम महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे हाती घेण्यात आले आहे. यामुळे या परिसरातील पाणी पुरवठा हा बंद ठेवण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी गोरेगाव, मालाड व कांदिवली येथील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून याची दखल घेऊन पाण्याचा योग्य वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट या ठिकाणी ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्या ठिकाणी ९०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार असून हे काम येत्या मंगळवारी २३ एप्रिलला हाती घेतले जाणार आहे. हे काम बुधवारी देखील सुरू राहणार असल्याने दुरुस्तीच्या कामाच्या या कालावधीत गोरेगाव परिसरातील काही भागांत पाणीपुरवठा हा बंद राहणार असल्याने नागरिकांनी या काळात पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
पी दक्षिण (गोरेगाव) परिसरातील वीटभट्टी, कोयना वसाहत, स्कॉटर्स वसाहत, कामा इंडस्ट्रीयल इस्टेट, रोहिदास नगर व शर्मा इस्टेट या भागात १०० टक्के पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
पी पूर्व (मालाड पूर्व) – दत्त मंदिर मार्ग, दफ्तरी मार्ग, खोत कूवा मार्ग, खोत डोंगरी, मकरानी पाडा आणि हाजी बापू मार्ग, तानाजी नगर, कुरार गांव, रहेजा संकुल, साईबाबा मंदिर, वसंत व्हॅली परिसरात देखील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
आर दक्षिण (कांदिवली) –बाणडोंगरी, कांदिवली (पूर्व) भागातील गोरेगावमधील पांडुरंगवाडी, गोकूळधाम, जयप्रकाश नगर, नाईकवाडी, गोगटेवाडी, कन्यापाडा, कोयना वसाहत, आय. बी. पटेल मार्ग, यशोधाम, संतोष नगर, विश्वेश्वर मार्ग, प्रवासी इंडस्ट्रीयल इस्टेट, राजीव गांधी नगर, आरे मार्ग, श्रेयस वसाहत येथे बुधवारी पाणी बंद राहणार आहे. तर मालाड पूर्वमधील पिंपरी पाडा, पाल नगर, संजय नगर, एम. एच. बी. वसाहत, इस्लामिया बाजार, जानू कम्पाउंड, शांताराम तलाव, ओमकार लेआऊट, पिंपरी पाडा, चित्रावणी, स्वप्नापूर्ती, घरकुल, गोकूळधाम, यशोधाम, सुचिताधाम, दिंडोशी डेपो, ए. के. वैद्य मार्ग, राणी सती मार्ग येथेही बुधवारी पाणी बंद राहणार आहे. नागरिकांनी याची दखल घ्यावी आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
संबंधित बातम्या