मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाऊ किंवा भाई नव्हे, मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार; भाजप खासदाराचं सूचक विधान

भाऊ किंवा भाई नव्हे, मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार; भाजप खासदाराचं सूचक विधान

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 20, 2022 11:03 AM IST

विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये दहाव्या जागेसाठी मोठी चुरस बघायला मिळत आहे.

विधान परिषदेत ५ जागा जिंकू असा भाजपला विश्वास
विधान परिषदेत ५ जागा जिंकू असा भाजपला विश्वास (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्यानं या निवडणुकीची रंगत वाढली आहे. अकरावा कोण पराभूत होणार आणि कोण बाजी मारणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, भाजपचे (BJP) राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी सूचक असं ट्विट केलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार असं खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग न्यूज

विधान परिषदेच्या रिंगणात भाजपचे (BJP) ५ तर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) प्रत्येकी २ उमेदवार आहेत. संख्याबळ पाहता भाजपच्या ४ जागा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप हे अतिरिक्त उमेदवार आहेत. त्यामुळे दहाव्या जागेसाठी या दोघांमध्येच लढत होणार आहे. मात्र गुप्त मतदान असल्यानं विधान परिषदेची चुरस वाढली आहे. विधान परिषदेत अपक्ष आणि इतर लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

राज्यसभेप्रमाणे ही निवडणूकसुद्धा आम्ही जिंकू असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यातच आता भाजपचे खासदार अनिल बोंडेंच्या ट्विटने खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, "काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा." नाव घेतलं नसलं तरी अनिल बोंडे यांचा रोख आमश्या पाडवी यांच्याकडे आहे.

कोण आहेत ११ उमेदवार?
भाजप - प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय
शिवसेना - सचिन अहिर, आमश्या पाडवी
राष्ट्रवादी काँग्रेस - एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर
काँग्रेस - भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या