मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. स्टेरॉईडच्या अतिसेवनाचा मनावर परिणाम.. जिम ट्रेनर तरुणाचा जन्मदात्यांवर चाकू हल्ला, आईचा मृत्यू

धक्कादायक.. स्टेरॉईडच्या अतिसेवनाचा मनावर परिणाम.. जिम ट्रेनर तरुणाचा जन्मदात्यांवर चाकू हल्ला, आईचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 11, 2023 10:49 PM IST

Thane crime news : जिममध्ये ट्रेनरचे काम करणाऱ्या तरुणानेआई-वडिलांवर चाकूने सपासप वार करून जखमी केले. या हल्ल्यात आरोपीच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून वडिल गंभीर आहेत.

इनसेटमध्ये आरोपी संकल्प भाटकर
इनसेटमध्ये आरोपी संकल्प भाटकर

ठाणे– ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिममध्ये ट्रेनरचे काम करणाऱ्या तरुणाने आई-वडिलांवर चाकूने सपासप वार करून जखमी केले. या हल्ल्यात आरोपीच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून वडिल गंभीर आहेत. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. संकल्प भाटकर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. विनिता विलास भाटकर (वय६६) असे मृत महिलेचे नाव असून वडिल विलास मुकुंद भाटकर (वय ७७) जखमी आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकल्पचा त्याच्या आई-वडिलांबरोबर वाद झाला होता. त्यातूनच त्याने घरातून चाकून आई-वडिलांवर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी होते. आई विनिता यांचा मृत्यू झाला आहे तर वृद्ध वडील विलास यांच्यावर घोडबंदरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संकल्प मुंबई श्री २०१९ चा मानकरी होता. तसेच सध्या तो जिममध्ये ट्रेनिंग देण्याचे काम करतो. शेजारच्या लोकांनी सांगितले की, संकल्प मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड घेत होता. याचा त्याच्या मनावर परिणाम झाला होता.

 

आई-वडिलांवर हल्ला करून तो फरार झाला होता. कासारवडवली पोलिसांच्या पथकाने आरोपीला नेहरू नगर कुर्ला येथून अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

IPL_Entry_Point

विभाग