मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SRH vs MI IPL 2023 : मुंबईच्या विजयाची हॅट्रिक, हैदराबादचा अखेरच्या षटकात पराभव

SRH vs MI IPL 2023 : मुंबईच्या विजयाची हॅट्रिक, हैदराबादचा अखेरच्या षटकात पराभव

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 18, 2023 11:28 PM IST

SRH vs MI IPL 2023 : मुंबई इंडियन्सने हैदराबादवर १४ धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील तिसरा विजय साजरा केला आहे.

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2023 Live Score
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2023 Live Score (HT)

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2023 Live Score : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने गमावलेले आहे. त्यामुळं आजचा सामना जिंकून स्पर्धेत लय मिळवण्यासाठी रोहित आणि मार्करम प्रयत्न करताना दिसणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

 

  • मुंबईच्या १९२ धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ १७८ धावांवर ऑलऑउट झाला आहे.
  • आयपीएलमधील मुंबईला तिसरा विजय, अर्जुन तेंडुलकरचा अखेरच्या षटकात टिच्चून मारा
  • क्लासेन आणि मार्करमची खेळी व्यर्थ, हैदराबादचा अखेरच्या षटकात १४ धावांनी पराभव
  • मुंबईच्या विजयाची हॅट्रिक, हैदराबादचा अखेरच्या षटकात पराभव
  • हैदराबादचा स्कोर : १४ षटकांत १२८-५
  • हैदराबादचे पाच फलंदाज तंबूत, क्लासेन-अग्रवाल क्रीझवर
  • सलामीवीर मयंक अग्रवाल ४६ (३७) धावांवर खेळत आहे.
  • विस्फोटक फलंदाजी करत असलेला क्लासेन ३६ (१५) धावांवर बाद झाला आहे.
  • अभिषेश शर्मा १, हॅरी ब्रूक ९, राहुल त्रिपाठी ७ आणि मार्करम २२ धावांवर बाद झाला आहे.
  • सनरायझर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली आहे.
  • टीम डेव्हिडने ११ चेंडूत १६ धावांची सुपरफास्ट खेळी केली आहे.
  • कॅमरन ग्रीनने केलेल्या वेगवान ६० धावांच्या बळावर मुंबईने १९३ धावांचा डोंगर उभारला आहे.
  • मुंबईचा डाव संपला, हैदराबादला विजयासाठी १९३ धावांचं लक्ष्य
  • मुंबईचा स्कोर : १७ षटकांत १५३ धावा, चार गडी बाद
  • हैदराबादच्या मार्को यान्सेनचा जलवा, मुंबईच्या दोन फलंदाजांना तंबूत पाठवलं
  • कॅमरन ग्रीन ३७ चेंडूत ४८ धावांवर खेळत आहे.
  • तिलक वर्माच्या तडाखेबंद फलंदाजीने मुंबईची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
  • इशान किशन ३८ धावांवर बाद झाला आहे.
  • अकरा षटकांनंतर मुंबईचा स्कोर : ८७-१
  • इशान किशनने ३० चेंडूत ३८ तर कॅमरन ग्रीनने १८ चेंडूत २० धावा फटकावल्या आहेत.
  • मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशन आणि कॅमरन ग्रीनने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली आहे.
  • इशान-ग्रीनकडून हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई, चौकार षटकारांची आतिषबाजी
  • इशान किशन १९ (१३) धावांतर तर कॅमरून ग्रीन तीन धावांवर खेळत आहे.
  • मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा २८ (१८) धावांवर बाद झाला आहे. नटराजनने त्याला बाद केलं आहे.
  • रोहितच्या रुपात मुंबईला पहिला झटका, पाच षटकात ४४ धावा
  • रोहित शर्मा आणि इशान किशने डावाची सुरुवात केली आहे.
  • हैदराबादने टॉस जिंकला, मुंबईची प्रथम फलंदाजी
  • हैदराबादचा कर्णधार एडन मार्करने टॉस जिंकला असून त्याने मुंबई इंडियन्सला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे.
  • थोड्याच वेळात टॉस होणार आहे.
  • मुंबई इंडियन्सची संभावित प्लेइंग ११ :
  • रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, पियुष चावला, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, अर्जुन तेंडुलकर.
  • हैदराबादची संभावित प्लेइंग ११ :
  • एडन मार्करम (कर्णधार), मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यान्सिन, मयंक मार्कंडेय, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

IPL_Entry_Point