मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri Bypoll : ठाकरे गटाला अंधेरीतून नवसंजीवनी; ऋतुजा लटके पोटनिवडणुकीत विजयी

Andheri Bypoll : ठाकरे गटाला अंधेरीतून नवसंजीवनी; ऋतुजा लटके पोटनिवडणुकीत विजयी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 06, 2022 03:15 PM IST

Andheri Bypoll : अंधेरीतील पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. या निवडणुकीत ११ हजारांहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.

Andheri East Bypoll Result 2022
Andheri East Bypoll Result 2022 (HT)

Andheri East Bypoll Result 2022 : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतील ठाकरे गटाला मोठी नवसंजीवनी मिळाली आहे. कराण या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मोठ्या फरकानं विजय झाला आहे. १९ व्या फेरीअखेरीस त्यांना आतापर्यंत ६५६१८ मतं मिळाली असून त्यानंतर नोटा या पर्यायाला १२,७२१ मतदारांनी पसंती दिली आहे. त्यामुळं आता ठाकरे गटाच्या समर्थकांनी मुंबईत ठिकठिकाणी अंधेरीतील विजयाचा आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अंधेरीत मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी आघाडी घेतली होती. ही आघाडी प्रत्येक फेरीत त्यांनी कायम राखली. त्यांच्यानंतर नोटा या पर्यायाला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. मतमोजणीच्या १९ फेऱ्या पूर्ण झाल्या असून लटकेंचा विजय झाला आहे.

ECI
ECI (HT)

दरम्यान शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीत पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी ठाकरे गटानं रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिली होती. तर भाजपनं मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवलं होतं. परंतु भाजपनं निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु अखेरच्या दिवशी सहा अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यानं तीन नोव्हेंबरला अंधेरीत मतदान झालं होतं. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवला आहे.

IPL_Entry_Point