मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Twitter Layoffs : ‘माझी चूक झाली मला माफ करा’, ट्विटरच्या माजी सीईओंनी मागितली कर्मचाऱ्यांची माफी

Twitter Layoffs : ‘माझी चूक झाली मला माफ करा’, ट्विटरच्या माजी सीईओंनी मागितली कर्मचाऱ्यांची माफी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 06, 2022 11:16 AM IST

Twitter Layoffs : उद्योगपती इलोन मस्क यांनी ट्विटरवर ताबा मिळवल्यानंतर कंपनीत मोठी कर्मचारी कपात केली आहे. त्यामुळं अनेकांचा रोजगार गेला आहे.

Twitter Layoffs News In Marathi
Twitter Layoffs News In Marathi (HT)

Twitter Layoffs News In Marathi : ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलोन मस्क यांनी विद्यमान सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह जवळपास ७५०० लोकांना कामावरून कमी केलं आहे. त्यामुळं या निर्णयावरून त्यांच्यावर जगभरातून टीका केली जात असतानाच आता ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जेफ डोर्सी यांनी कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.

इलोन मस्क यांनी ट्विटर कंपनीत कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना माजी सीईओ जेफ डोर्सी यांनी म्हटलं आहे की, सध्या ट्विटरची आणि कर्मचाऱ्यांची जी स्थिती आहे, त्यासाठी मी जबाबदार असून माझ्यावर अनेक लोक नाराज आहेत. मी ट्विटर कंपनी सोडल्यानंतर त्यात अनेक मोठे आणि वेगानं बदल केले जात असल्यानं मला त्याची खंत वाटते, असं माजी सीईओ जेफ डोर्सी यांनी म्हटलं आहे.

ट्विटरचं वर्तमान आणि भूतकाळ मजबूत आणि परिवर्तनीय असल्यानं सध्याची परिस्थिती कठीण असली तरी त्याला चांगले दिवस येतील. सध्या ट्विटर कंपनीचे कर्मचारी ज्या अवस्थेत आहेत, त्यासाठी मी जबाबदार असून त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो, असंही जेफ डोर्सी यांनी म्हटलं आहे. दरम्यान इलोन मस्क यांनी ट्विटर कंपनीची खरेदी केल्यानंतर त्यांनी कर्मचारी कपात करायला सुरुवात केली आहे. याशिवाय ट्विटरवरील युजर्सला ब्लू-टिक कायम ठेवण्यासाठी महिन्याकाठी आठ डॉलर द्यावे लागणार आहेत. त्यामुळं आता यावरूनही मस्क यांच्यावर टीका केली जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग