मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लष्कराच्या तुलनेत अग्निवीरांना शिवसेनेत अधिक संधी; संजय राऊत यांचं खोचक ट्वीट

लष्कराच्या तुलनेत अग्निवीरांना शिवसेनेत अधिक संधी; संजय राऊत यांचं खोचक ट्वीट

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 20, 2022 10:32 AM IST

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर टीका करताना तरुणांना सेनेत चांगली संधी असल्याचं म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

लष्कर भरतीसाठी (Indian Army) केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme) घोषणा गेल्या आठवड्यात केली. मात्र या योजनेला देशात मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. यानंतर भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेत ही योजना रद्द होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. ज्यांच्यावर आंदोलनात गुन्हे दाखल झाले नसतील अशाच तरुणांना लष्करात घेतले जाईल असेही लष्कराने सांगितले. दरम्यान, आता शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर अग्निपथ योजनेवरून खोचक टीका केली आहे.  

ट्रेंडिंग न्यूज

संजय राऊत यांनी तरुणांना शिवसेनेत येण्याची ऑफर देत लष्कराच्या तुलनेत ४ वर्षात चांगली संधी असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले की, "तरुण जर शिवसेनेत आले तर त्या तरुणांना अग्निपथ योजनेंतर्गत लष्करात भरती होण्याच्या तुलनेत ४ वर्षात चांगली संधी मिळेल." भारतीय लष्कराने अग्निपथ योजनेंतर्गत ४ वर्षांसाठी तरुणांना देशसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अग्निपथ योजनेतून शॉर्ट टर्म संधीला देशभरातील तरुणांकडून विरोध केला जात असून ४ वर्षानंतर काय असा प्रश्न विचारला जात आहे. 

केंद्र सरकारवर टीका करताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मै भी चौकीदार या घोषणेवरून निशाणा साधला. संजय राऊत यांनी म्हटलं की, गेल्या निवडणुकीत तरुण ४ वर्षे प्रशिक्षणाशिवाय चौकीदार बनले होते आता ते ४ वर्षाच्या लष्करी प्रशिक्षणासह चौकीदार होतील. तरुणांमध्ये संतापाची भावना असल्याचंही राऊतांनी सांगितले.

संजय राऊत यांनी ट्विटरवर अग्निपथ योजना मागे घ्या अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांचा फोटो शेअर केला आहे. देशात अनेक ठिकाणी अग्निपथ य़ोजनेविरोधात आंदोलन होत आहे. आज भारत बंदची घोषणाही कऱण्यात आली आहे. अग्निपथ योजनेविरोधातील या आंदोलनाला काही राज्यात हिंसक वळणही लागले आहे. तेलंगनात शुक्रवारी एका तरुणाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या