मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rutuja Latke : महाराष्ट्राला शिवसेना व ठाकरेंशिवाय पर्याय नाही; ऋतुजा लटकेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Rutuja Latke : महाराष्ट्राला शिवसेना व ठाकरेंशिवाय पर्याय नाही; ऋतुजा लटकेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 14, 2022 08:58 AM IST

Andheri Bypoll 2022 : ऋतुजा लटकेंना हायकोर्टानं दिलासा दिल्यानंतर त्यांनी आज सकाळी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यानंतर त्या महापालिकेसाठी रवाना झाल्या.

Rutuja Latke News Marathi
Rutuja Latke News Marathi (HT)

Rutuja Latke News Marathi : मुंबई उच्च न्यायालयानं ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश महापालिकेला दिल्यानंतर आता आज सकाळी ऋतुजा लटकेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल परब हे देखील उपस्थित होते. त्यानंतर ऋतुजा लटके या राजीनाम्याचं पत्र स्वीकारण्यासाठी बीएमसीत दाखल झाल्या असून आज त्यांच्याकडून उमेदवारीचा अर्ज दाखल केला जाणार आहे. परंतु ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ऋतुजा लटकेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ऋतुजा लटके म्हणाल्या की, आजच्या दिवसाची सुरुवात मी बाप्पांचं दर्शन घेऊन करत आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारीचा अर्ज भरायचा असल्यानं आता मी बीएमसी कार्यालयात राजीमाना स्वीकारल्याचं पत्र घेणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याआधी समर्थकांकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू असल्याचीही माहिती ऋतुजा लटकेंनी दिली आहे.

महाराष्ट्रात शिवसेना व ठाकरेंशिवाय पर्याय नाही- लटके

मला अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत रेकॉर्डब्रेक विजय खेचून आणायचा आहे. त्यासाठी सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली आहे. रमेश लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मालपाडोंगरीतील गणपतीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर मी देखील मालपाडोंगरी गणपतीचं दर्शन घेऊनच अर्ज दाखल करणार असल्याचं ऋतुजा लटकेंनी सांगितलं.

भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी...

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची जागा शिंदे गटाला सोडण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु काल रात्री मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते आशिष शेलार यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यात मुरजी पटेल यांना भाजपकडून उमेदवारी देण्यावर एकमत झालं. त्यामुळं आता या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point