मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aamshya Padavi news : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! विश्वासू आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात

Aamshya Padavi news : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! विश्वासू आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 17, 2024 04:39 PM IST

Aamshya Padavi quits Shiv Sena UBT: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

Aamshya Padavi Joins Shivsena
Aamshya Padavi Joins Shivsena

Aamshya Padavi Joins Shivsena: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून आमश्या पाडवी यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, आज त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.

ट्रेंडिंग न्यूज

आमश्या पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी समाजाचे नेते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत कार्यरत होते. दरम्यान, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील अनेक नेत्यांना डावलून आमश्या पाडवी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. मात्र, पाडवी हे ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले. मात्र, आज त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कल्याण हा कायमच शिवसेनेचा अभेद्य गड राहिला आहे. याच कल्याण शहरात गेल्या काही वर्षात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे करून येथील शहरांमध्ये आमूलाग्र बदल केला. याच विकासकामांकडे बघून अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून शिवसेनेमध्ये येत आहेत. त्यांच्या येण्याने हा शिवसेनेचा गड अधिक भक्कम होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान उपस्थित होते.

IPL_Entry_Point