MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना! वंचितला दिला शेवटचा पर्याय, नवा प्रस्ताव देणार नाही-vanchit bahujan aghadi demanded 17 seats for the lok sabha mva consideration was given to the meeting without the vba ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना! वंचितला दिला शेवटचा पर्याय, नवा प्रस्ताव देणार नाही

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना! वंचितला दिला शेवटचा पर्याय, नवा प्रस्ताव देणार नाही

Mar 17, 2024 01:11 PM IST

MVA Seat Sharing update : लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे आता वंचित आघाडीला नव्याने प्रस्ताव दिला जाणार नसल्याचे समजते.

 महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना! वंचितला दिला शेवटचा पर्याय
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना! वंचितला दिला शेवटचा पर्याय

MVA Seat Sharing update : लोकसभा निवडणुकीचे बीगूल वाजले आहे. भाजपने आपली यादी जाहीर केली आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. वंचित विकास आघाडीला ४ जागावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, वंचित आघाडीने या बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुले अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता वंचितला हा शेवटचा पर्याय दिला असून या पुढे नव्याने कोणताही प्रस्ताव देणार नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आता वंचित आघाडी कोणता निर्णय घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

dress code in temples : श्रीक्षेत्र भीमाशंकर, जेजूरी खंडोबा मंदिरासह पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिरात वस्त्रसंहिता लागू

शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. निवडणुकांचा बीगूल वाजला असून सर्व पक्ष आपल्या आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहे. मात्र, राज्यात अद्याप महाविकास आघाडीचे जागा वाटपावरुण चर्चेच्या फेऱ्या सुरूच आहेत. महाविकास आघाडीकडून २७ जागांची यादी देण्यात आली होती. यातील ४ जागांवर महाविकास आघाडीने निवडणूक लढवावी असा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला दिला आहे. मात्र, वंचितने यावर अद्याप निर्णय घेतला नाही. शनिवारी झालेल्या बैठकीत आता वंचितने भूमिका घ्यायची आहे.

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात कोरेगाव पार्क येथे आढळला पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह

महाविकास आघाडीकडून नव्याने प्रस्ताव दिला जाणार नाही असे ठरले आहे. त्यामुळे आता महावीकस आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. ही बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडली. वंचित बहुजन आघाडीने जास्तीच्या जागा मागीतल्याने आता वंचित शिवाय आघाडी अशी भूमिका नेत्यांनी घेतल्याचे समजते. ४४ जागांपैकी शरद पवार यांचा पक्ष हा दहा ते बारा जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस१७ ते ते १८ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. आणि इतर जागा या शिवसेना ठाकरे गट आणि मित्र पक्ष राजू शेट्टी यांना वाटून दिल्या जाणार आहे.

मुंबईत आज शिवाजी पार्क वर राहुल गांधी यांची मोठी सभा होणार आहे. या ठिकाणी इंडिया आघाडीकडून मोठे शक्ति प्रदर्शन केले जाणार आहे. या वेळी इंडिया आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार आहे. अशा स्थितीत वंचित आता काय भूमिका घेणार या कडेलक्ष लागून आहे.

Whats_app_banner