मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena Thackeray vs Shinde : शिवसेना कुणाची?; आज निर्णयाची दाट शक्यता

Shiv Sena Thackeray vs Shinde : शिवसेना कुणाची?; आज निर्णयाची दाट शक्यता

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 30, 2023 11:01 AM IST

Shiv Sena Symbol Row: धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष नावासाठी ठाकरे आणि शिंदे गटात लढा सुरू आहे. निवडणूक आयोगात हा प्रश्न प्रलंबित आहे. यावर दोन्ही गटाकडून आपल्या बाजू मांडण्यात आल्या आहेत. लेखी युक्तीवाद करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

Shiv Sena Thackeray vs Shinde
Shiv Sena Thackeray vs Shinde

मुंबई : शिवसेना कुणाची या बाबत ठाकरे-शिंदे गटात गेल्या काही दिवसंपासून लढा सुरू आहे. शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी पक्षावरी आपला दावा सांगितल्याने हा वाद सुप्रीम कोर्टा सोबत निवडूक आयोगापुढेही आहे. गेल्या सुनावणीत दोन्ही गटाच्या वकिलांनी आपला पक्ष चिन्ह आणि नावा संदर्भात आपले दावे सादर केले होते. तसेच युक्तिवाद देखील करण्यात आला होता. आज लेखी युक्तिवाद सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज निवडणूक आयोग निर्णय देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आल्यामुळे ठाकरे गटाकडून निकाल द्या किंवा संघटनात्मक निवडणुकीची परवानगी मागितली होती. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रे देखील सादर केली आहे. निवडणूक आयोगात या प्रकरनी युक्तिवाद देखील करण्यात आला होता.

दोन्ही बाजूंचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. गेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्द्यांवर एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर दोन्ही गटाला ३० तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगानं मुदत दिली होती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाकडून आज निवडणूक आयोगात लेखी स्वरूपात काय काय मुद्दे मांडले जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी होणार नसली तरी युक्तिवाद लिखित स्वरूपात मिळाल्यानंतर पुढच्या काही दिवसात निवडणूक आयोग चिन्हबाबतचा आपला अंतिम निकाल देऊ शकतो.

या पूर्वी १० तारखेला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्न निर्माण केले होते. सुप्रीम कोर्टात प्रकरण असतांना ही सुनावणी आयोग घेऊ शकते की नाही याबाबत आधी निकाल मिळवा अशी विनंती त्यांनी केली होती. पण या प्रकरणाच्या वैधतेसह सर्व निकाल आम्ही एकत्रित देऊ असे आयोगाने म्हटले होते. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी, मणिंदर सिंह यांनी देखील या प्रकरणी युक्तिवाद करत ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्न उपस्थित केले होते. सादिक अली केसनुसार अशा वादावर निर्णयासाठी निवडणूक आयोग हेच एकमेव अथॉरिटी आहे असा युक्तिवाद करण्यात आला होता.

IPL_Entry_Point

विभाग